1 May 2025 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा

Income Tax Notice

Income Tax Notice | बहुतांश व्यक्तींना इन्कम टॅक्सशी निगडित काही नियमांबद्दल गोष्टी ठाऊक नसतात. इन्कम टॅक्स वाचवण्याच्या नादात ते फार मोठी चुक स्वतःच्या अंगावर ओढाळून घेत असतात. याचे नेमके कारण काय, आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून कोणत्या प्रकारचे 5 ट्रांजेक्शन आहेत जे तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये चुकून सुद्धा करायचे नाहीयेत. समजा तुम्ही हे केलं तर मात्र इन्कम टॅक्सच्या नोटीसपासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.

इन्कम टॅक्स चोरी करणारे भामटे टॅक्स विभागाच्या रडार यंत्रणेवरच असतात. त्यामुळे बँकिंग ट्रान्झॅक्शन करताना काही नियमांचे पालन करायलाच हवे. तुम्ही फायनान्शिअल इयरमध्ये या 5 चुका करणे टाळा जेणेकरून तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या रडार यंत्रणेवर येणार नाही.

बँक FD :

बहुतांश व्यक्ती पैसे गुंतवण्यासाठी बँकेत FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय निवडतात. एफडीमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. परंतु एखादा गुंतवणूकदार एकाच फायनान्शिअल वर्षात 10 लाखांपेक्षा अधिक पैशांची FD करत असेल तर, त्याच्या घरी इन्कम टॅक्स नोटीसची धाड पडू शकते. इन्कम टॅक्स नोटीस तुमच्या फायनान्शिअल रेकॉर्डला गालबोट लावू शकते.

अधिक रक्कमेची संपत्ती खरेदी केल्यानंतर :

तुम्ही तुमच्या आयुष्यात किती संपत्ती खरेदी करत आहात. तुमचे प्रॉपर्टी डिटेल त्याचबरोबर तुमची मालमत्ता तुमची संपत्ती याविषयीचा संपूर्ण रेकॉर्ड प्रॉपर्टी डिपार्टमेंटकडे असतो. समजा तुम्ही एका वर्षामध्ये 30 लाखांपेक्षा अधिक रक्कमेची संपत्ती खरेदी करत आहात तर मात्र तुम्हाला सावधानीने पावलं उचलावी लागतील. तुमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची गल्लत होता कामा नये. अगदी कायदेशीररित्या सर्व गोष्टी हाताळाव्या लागतील. नाहीतर तुमच्या घरी इन्कम टॅक्सची नोटीस आल्याशिवाय राहणार नाही.

सेविंग अकाउंटमधील ट्रांजेक्शन :

तुमच्या घरी इन्कम टॅक्सची नोटीस येण्यास आणखीन एक आणि सामान्य गोष्ट कारणीभूत असते. ती म्हणजे आपण नॉर्मल सेविंग ट्रांजेक्शन करतो परंतु तुमचे हे ट्रांजेक्शन एका वर्षात त्याचबरोबर वेगवेगळ्या खात्यांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त झाले तर मात्र इन्कम टॅक्सची नोटीस तुमच्या घरी घेण्याची शक्यता असते.

विदेशातील संपत्ती खरेदी केल्यावर :

समजा एखाद्या व्यक्तीने एक वित्तीय वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक विदेशातील संपत्ती किंवा विदेशी मुद्रा त्याचबरोबर प्रवासी चेक, आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खरेदी केलं तर, इन्कम टॅक्सची नोटीस तुमच्या दारात येऊ शकते.

10 लाखांपेक्षा अधिक म्युच्युअल फंड, डिबेंचर खरेदी केल्यानंतर :

समजा एखादा गुंतवणूकदार एका वित्तीय वर्षामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक म्युच्युअल फंड डीबेंचर किंवा काही बाँड खरेदी करत असेल तर मात्र तुमच्या घरी इन्कम टॅक्सची नोटीस येण्याची शक्यता आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Income Tax Notice Tuesday 14 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Income Tax Notice(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या