2 May 2025 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Income Tax on Salary | पगारदारांनो, लाखांच्या घरात पगार असतानाही टॅक्सचे खूप पैसे वाचवता येतील; ही ट्रिक लक्षात ठेवा

Income Tax on Salary

Income Tax on Salary | प्रत्येक व्यक्तीला वर्षातून एकदा आयकर विवरणपत्र भरावे लागते. यामध्ये आपला टॅक्स जास्तीत जास्त प्रमाणात कसा काय वाचवता येईल याकडे लोक लक्ष देतात. नोकरीवर रुजू झाल्यानंतर तुम्हाला बरेच वेतन भत्ते मिळतात. या विविध भत्यांमधून टॅक्स फ्री भत्यांमुळे तुम्ही मोठे पैसे वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला एकूण 5 महागाई भत्तांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कर सवलती पासून अगदी सहजरित्या वाचू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या एचआरबरोबर बोलणी करून घ्यावी लागेल.

HRA घरभाडे भत्ता :

बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता प्रदान करतात. हा भत्ता तुमच्या पगारातील 40 ते 50% पर्यंत असतो. समजा तुम्हाला तुमच्या कंपनीकडून घरभाडे भत्ता मिळत नसेल तर लगेचच तुमच्या HR बरोबर संपर्क साधा आणि कर वाचवण्यासाठी तुमच्या पगारात घरभाडे भत्त्याचा समावेश करा.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी :

ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन. या संस्थेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला मूळ पगार आणि महागाई भत्ता म्हणून 12% योगदान द्यावे लागते. कर्मचाऱ्या एवढेच योगदान कंपनी देखील देते. त्याचबरोबर कर्मचारी प्राप्तीकर कायद्यानुसार 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. म्हणजेच या भत्त्यावर देखील तुम्हाला कर सवलत दिली जाते.

लिव्ह ट्रॅव्हल भत्ता :

लिव्ह ट्रॅव्हल भत्ता बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देतात. यामध्ये कर्मचाऱ्याला कुठेही जाण्यासाठी आणि राहण्यासाठीचा हा भत्ता दिला जातो. यामध्ये कर्मचारी एकूण 4 वर्षांमध्ये 2 वेळा एखाद्या लॉन्ग ट्रीपवर आरामात जाऊ शकतो. परंतु तुम्हाला नंतर लिव्ह ट्रॅव्हल भत्ताअंतर्गत परतफेड करावी लागते. तुमच्या पगारावर LTA चा समावेश नसेल तर, समाविष्ट करून घ्या.

इंटरनेट आणि मोबाईल फोन भत्ता :

कर्मचाऱ्यांचे करपात्र उत्पन्न कमी होण्यासाठी कंपनी इंटरनेट आणि मोबाईल फोन भत्ता देखील देते. यामध्ये तुम्ही मोबाईल फोनचे बिल, इंटरनेटसाठी जो काही खर्च करता तो खर्च कंपनी तुम्हाला एका मर्यादेपर्यंत देते. यामध्ये कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे कर वसुलेले जात नाहीत. या कारणामुळे तुम्हाला याचा फायदाच फायदा अनुभववायला मिळतो.

कार संरक्षण भत्ता :

बऱ्याच कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्य संरक्षण भत्ता देखील देतात. यामध्ये कर्मचाऱ्याच्या गाडीचे संरक्षण, पेट्रोल, डिझेल हे सर्व गोष्टींचा समावेश असतो. तुम्हाला तुमच्या कारचा खर्च जास्त वाटत असेल तर, याबद्दल तुमच्या कंपनीतील HR बरोबर संपर्क साधू शकता. यामधून तुम्हाला असे समजले की, तुम्हाला कार मेंटेनेस मिळत आहे याचाच अर्थ असा की तुम्हाला कार संरक्षण भत्त्यावर कर भरावा लागणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Income Tax on Salary 02 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Income Tax on Salary(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या