 
						Loan EMI Alert | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी आतापर्यंत बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःच्या गरजा भागवल्या असतील. प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार कर्ज घेतो. काहीजण घरासाठी गृह कर्ज घेतात तर, काहीजण कार घेण्यासाठी कार लोन घेतात. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्या परंतु, कर्ज घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
बहुतांच्या व्यक्ती असे आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कर्ज घेतलेलं नाही. कर्जाविषयीची संपूर्ण माहिती नसलेली व्यक्ती जेव्हा कर्ज घेण्याचा विचार करतात तेव्हा त्यांना फसवणुकीला बळी पडावे लागू शकते. अशावेळी कर्जदारांची पूर्णपणे कोंडी होते. कर्ज फेडताना, त्याआधी कर्जाचे डील करताना त्याचबरोबर कर्ज फेडीच्या व्याजदराविषयी त्यांच्या मनात नंतर शंका निर्माण होऊ लागतात. तुम्ही देखील भविष्यात कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, आम्ही सांगितलेल्या काही गोष्टींवर नजर टाका.
क्रेडिट स्कोर उत्तम ठेवा :
तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा क्रेडिट स्कोर 300 ते 900 आकड्यादरम्यान असेल तर, तुम्हाला कोणतीही बँक अगदी सहजपणे कर्ज देऊ शकते. एवढेच नाही तर तुम्हाला मिळणारे कर्ज हे चांगल्या व्याजदर असं हो उपलब्ध होते. कमी व्याजदरात कर्ज मिळाल्याने तुमचा जास्तीत जास्त फायदा होतो.
EMI कमीत कमी असावा :
तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते म्हणजेच EMI कमीत कमी ठेवावा. कमी पैशांच्या EMI मुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला होणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यास अडचण निर्माण होणार नाही. एवढंच नाही तर, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इमर्जन्सीसाठी लागणारा फंड या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमचा मासिक EMI कमीत कमी ठेवावा लागेल. तत्पूर्वी ही एक गोष्ट देखील लक्षात ठेवा, की, EMI दीर्घकाळासाठी ठेवत असाल तर, तुमचा कालावधी वाढत जातो आणि व्याजदर देखील वाढते.
व्याजदराची तुलना करणे महत्त्वाचे :
बहुतांश व्यक्ती कर्ज तर घेतात परंतु कर्जाची तुलना करत नाहीत. बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाची तुलना नक्कीच केली पाहिजे. ज्या वित्तीय संस्था त्याचबरोबर बँका कमीत कमी व्याजदरात कर्ज देतात त्याचबरोबर इतरही चार्जेस कमी घेतात अशा संस्थानांकडून कर्ज घेणे कधीही फायद्याचे ठरते.
कर्जफेडीचा कालावधी आणि कर्जाची रक्कम :
बहुतांश व्यक्ती गरज नसेल तरीसुद्धा कर्ज घेतात परंतु असं कारण अत्यंत चुकीचं आहे. अतिरिक्त कर्ज घेतलं तर तुम्ही कर्जबाजारी होऊ शकाल. कर्ज परतफेडची रक्कम जास्त होत असेल तर तुम्ही बँकांशी योग्य पद्धतीने डील करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कर्ज फेडीच्या कालावधीबद्दल देखील विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कर्ज परतफेडीचा कालावधी जास्तीचा घेतला असेल तर, तुम्हाला जास्त कर्ज फेडावे लागू शकते. तुम्ही व्याजदर जरी जास्त भरत असाल तरी, तुमचा ईएमआय कमी असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		