 
						Loan EMI Alert | प्रत्येक व्यक्ती त्याच्या वित्तीय गरजांसाठी एकदा तरी कर्ज घेतोच. काही व्यक्ती वारंवार कर्ज घेऊन वेळेवर फेडू शकत नाहीत आणि या कारणामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत काही फायनान्शिअल प्लॅनिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला कर्जबाजारी होण्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.
कर्जबाजारी होण्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स फॉलो करा :
1. वायफळ खर्च थांबवा :
प्रत्येक व्यक्तीच्या पगारातील बराच असा भाग वायफळ खर्चावर खर्च करतो. परंतु तुम्ही तुमच्या पगारानुसार तुझे आर्थिक नियोजन आखले पाहिजे. तुम्ही 50% रक्कम घरामधील किराणामाल त्याचबरोबर इतरही ग्रोसरी सामानावर खर्च केले पाहिजे. त्यानंतर पगारातील 30% रक्कम घर भाडे, मुलांच्या शाळेची फी यांसारख्या इतरही गोष्टींवर खर्च केली पाहिजे. उरलेली 20% रक्कम तुम्ही बचतीसाठी किंवा आपत्कालीन वेळेसाठी ठेवली पाहिजे.
2. कर्ज परतफेड :
तुम्ही कोणतेही कर्ज घ्या छोटे किंवा मोठे. कर्ज घेताना जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास कर्ज परतफेड करताना होतं. कितीही काहीही असलं तरी एक कर्ज घेतल्यानंतर दुसरं कर्ज घेऊ नका. दुसरं कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पहिले कर्ज पूर्णपणे फेडून टाकायचे आहे.
3. कर्जाची परतफेड करण्यासाठी बजेट प्लॅन करा :
तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड करायची असेल आणि कमी वेतनामुळे या सर्व गोष्टी अशक्य वाटत असतील तर, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आर्थिक बजेटनुसार कर्ज परतफेडचे व्यवस्थित प्लॅनिंग करावे लागणार आहे. यासाठी देखील तुम्ही 50:30:20 या फॉर्म्युलाचा अवलंब करू शकता.
4. वेळेवर पहिले कर्ज पूर्ण परतफेड करा :
वेळेवर पहिले कर्ज परतफेड करणे अत्यंत गरजेचे आहे. समजा तुम्ही कर्जाच्या शेवटच्या तारखेआधीच कर्जाची परतफेड करत असाल तर आणखीन उत्तम. शेवटची तारीख येण्याची वाट पाहत बसू नका. लवकरात लवकर अर्ज फेडण्याच्या मागे लागा. असं केल्याने तुमचा क्रेडिट कार्ड सुधारण्यास देखील मदत होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		