 
						Loan EMI Payment | आपण वेगवेगळ्या प्रकारचे EMI पेमेंट करत असतो. परंतु काही वेळा खात्यामध्ये पर्याप्त शिल्लक नसल्यामुळे ड्यू डेटवर आपले पेमेंट होत नाही. या कारणामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवर वाईट परिणाम होताना पाहायला मिळतो. एवढेच नाही तर, बँक तुमच्याकडून चार्जेस देखील वसुलते केवळ पेनल्टीच नाही तर तुम्हाला पुन्हा लोन घेण्यास देखील अडचणी निर्माण होतात.
सिबिल स्कोर ढासळून होते नुकसान :
ईटी ब्युरोच्या एका रिपोर्टनुसार एका व्यक्तीने लोनचे ईएमआय पेमेंट करण्यास उशीर केला होता. तर, त्याच्या एका दिवसाचे चुकीमुळे त्याला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्याचा सिबिल स्कोर धडाम झाला. यामध्ये त्यांचा टॉपअप लोन आणि होम लोनच्या सिबिल स्कोरवर चांगला परिणाम झालेला पाहायला मिळाला. त्यांचा सिबिल स्कोर ऑगस्ट 2024 मध्ये 799 होता हा सिबिल स्कोर खाली पडून 2024 मध्येच सप्टेंबर महिन्यात 772 झाला.
अशा वाईट अनुभवानंतर त्या व्यक्तीने लोन ईएमआयचे पेमेंट वेळेवर करण्याचा निर्णय घेतला. तरीसुद्धा त्यांचा सिबिल स्कोर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत 772 पासून वाढला नाही. त्यामुळे तुम्ही अशी चूक मुळीच करू नका.
जास्तीत जास्त व्याज द्यावे लागेल :
तुम्हाला केवळ पॅनल्टी नाही तर, इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. समजा तुम्ही एखाद्या वेळेस होम लोन इएमआय चुकवला तर, तुम्हाला दुसऱ्या लोनसाठी बऱ्याच अडचणी येऊ शकतील. समजा तुम्हाला लोन मिळालं तर, तुमच्याकडून परतफेडीसाठी जास्तीचे व्याज घेण्यात येईल.
अशा पद्धतीने तयार होतो क्रेडिट स्कोर :
काही व्यक्ती अगदी सहजपणे लोनचे हप्ते भरण्यास विसरून जातात. परंतु तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर तुम्हाला चुकून सुद्धा ईएमआय पेमेंट भरण्यापासून विसरायचं नाही आहे. तरच तुमचा सिव्हिल स्कोर वाढत जाईल. एक चांगला सिबिल स्कोर तुमच्या पेमेंटच्या सातत्याचे पॉझिटिव्ह पॉईंट दर्शवण्याचे काम करतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		