 
						Loan Guarantor Alert | बऱ्याचवेळा आपल्या जवळचा मित्र लोन घेण्याच्या वेळी आपल्याला लोन गॅरेंटर होण्यास सांगतो किंवा आग्रह करतो. त्यावेळी आपण आपल्या खास जिगरी मित्रासाठी लोन गॅरेंटर होण्यास लगेच होकार देतो. आपण आपल्या मित्राला विश्वासहकार्य समजून त्याची मदत करण्यासाठी आणि त्याला चटकन लोन मिळण्यासाठी एक चांगला प्रयत्न करू पाहतो. परंतु काही वेळा कर्जाचे हमिदार बनणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला लोन गॅरेंटर बनल्यावर कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते याबद्दल सांगणार आहोत.
कर्ज हमीदार बनताना होऊ शकतात हे तोटे :
समजा तुम्ही तुमच्या मित्रासाठी लोन जामीनदार बनला आहात. परंतु काही कारणांमुळे तुमच्या मित्राने कर्जाचे पैसे पेडलेच नाही तर, जामीन असल्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. काही वेळा असंही होऊ शकतात की, तुमचा मित्र शहर सोडून किंवा देश सोडून निघून जाईल परंतु हमीदार बनण्याचे धाडस तुम्ही केल्यामुळे बँक तुमच्याकडूनच संपूर्ण कर्ज परतफेडीची मागणी करेल.
तुम्हाला हमीदार व्हायचं असेल तर, तुम्ही आर्थिक दृष्ट्या अतिशय सक्षमपणे गरजेचे आहे. सोबतच तुमचा सिबिल स्कोर देखील उत्तम असणे गरजेचे आहे. जर कर्जदाराने कर्ज परतफेड करण्यास सबशेर नकार दिला तर, बँक वारंवार तुम्हाला फोन करून कर्ज फेडण्याची मागणी करेल.
त्यामुळे या सर्व टेन्शनपासून दूर राहण्यासाठी हमीदार व्हायचं की नाही, किंवा कोणत्या व्यक्तीसाठी व्हायचं या सर्व गोष्टींचा विचार आधीच करणे गरजेचे आहे. कर्ज हमीदाराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल किंवा आर्थिक दृष्ट्या त्याच्याकडे पाठबळ नसेल तर त्याने कर्ज हमीदार बनण्याआधी विचार केला पाहिजे.
हमीदार नसेल राहायचं तर नाव कसं विथड्रॉ कराल?
तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी कर्जाचे हमीदार झाला असाल परंतु तुम्हाला इथून पुढे त्या व्यक्तीसाठी हमीदार राहायचं नसेल तर तुम्ही तुमचं नाव काढतं घेऊ शकता. यासाठी तुम्ही बँकेला विनंती करून नाव मागे घेण्यास सांगू शकता. त्यानंतर बँक कर्जदात्याचा दुसरा हमीदार शोधेल. दुसरा हमीदार झाल्याबरोबर तुमचं हमीदार म्हणून नाव काढलं जाईल.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		