 
						Loan Guarantor | आपल्या जवळील नातेवाईक त्याचबरोबर आपला मित्रपरिवार, आपली मैत्रीण किंवा आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आपल्याला. लोन गॅरेंटर बनण्यासाठी सांगत असेल तर, आपण मागच्या पुढचा विचार न करता थेट त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहतो आणि लोन गॅरेंटर बनण्याचा विचार करतो.
तुम्ही आपल्या व्यक्तींवर विश्वास ठेवून लोन गॅरेंटर बनता. आपल्याला शंभर टक्के गॅरंटी असते की, समोरचा व्यक्ती त्याचे पूर्ण पैसे भरेल. परंतु काही कारणांमुळे लोन गॅरेंटर बनणं धोक्याचे आणि जोखीमचे असू शकते. आज आपण लोन गॅरेंटर बनण्याच्या नुकसानांविषयी जाणून घेणार आहोत.
लोन गॅरेंटर बनणे जोखीमेचे काम :
1. लोन गॅरेंटर बनणे हे अत्यंत जोखीमेचे काम आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे लोन गॅरेंटर बनता म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या लोनची पूर्ण जबाबदारी घेता. तुम्ही ज्या व्यक्तीचे लोन गॅरेंटर झाला आहेत त्या व्यक्तीने त्याचे लोन भरले नाहीत तर, मात्र तुम्ही गोत्यात येऊ शकता. तुम्हाला त्या व्यक्तीचे संपूर्ण पैसे फेडावे लागू शकतात.
2. समजा लोन घेणारा व्यक्ती काही कारणांमुळे अचानक मृत्युमुखी पावला तर, उरलेले संपूर्ण लोन लोन गॅरेंटर भरतो. अशा परिस्थितीत लोन गॅरेंटर बँकांसाठी एक प्रकारचा लोनदाता बनतो. त्यामुळे लोन गॅरेंटर बनण्याआधी तुम्ही सर्व गोष्टींची पूर्तता करून घ्या.
3. लोन गॅरेंटर बनण्याआधी तुम्ही त्या व्यक्तीची लोन फेडण्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे की नाही हे तपासलं पाहिजे. त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तर, लोन गॅरेंटर बनण्यापासून वाचलं पाहिजे.
लोन गॅरेंटरमधून नाव परत घ्यायचं असेल तर काय करावे लागेल :
बऱ्याच व्यक्तींना लोन गॅरेंटर झाल्यानंतर नाव परत मागे घ्यायचं असतं. बहुतांशी व्यक्तींना यासंदर्भात प्रश्न पडलेले असतात. तर, आम्ही तुम्हाला सांगतो ही गोष्ट शक्य आहे. तुम्हाला नको हवं असेल तर, तुम्ही तुमचं नाव परत काढून घेऊ शकता. या गोष्टीसाठी तुम्हाला आणि लोन घेणाऱ्या व्यक्तीला बँकेमध्ये जाऊन एक रिक्वेस्ट अर्ज पाठवावा लागेल. लोन घेणाऱ्या व्यक्तीला दुसरा लोन गॅरेंटर मिळाल्याबरोबर तुमचे नाव लिस्टमधून काढून टाकले जाईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		