 
						Money Value | महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांपासून ते सर्व प्रवर्गातील व्यक्तींना वाढलेल्या महागाईमुळे भविष्याची चिंता सतावत असते. यासाठीच अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतात. गुंतवणूक केल्यानंतर भविष्यकाळ चांगला जाईल असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.
गुंतवणुकीवर तुम्ही असा विचार कधी केला आहे का?
परंतु केलेल्या गुंतवणुकीवर तुम्ही असा विचार कधी केला आहे का? की, आपण सध्याची रक्कम जमा करत आहोत किंवा गुंतवत आहोत तिचं मूल्य भविष्यामध्ये किती असेल. तसं तर प्रत्येकजण आपलं भविष्य सोईस्कर बनवण्यासाठीच ठिकठिकाणी गुंतवणूक करत असतो. परंतु काही योजनांमध्ये मॅच्युरिटी पीरियड जास्त कालावधीचा असतो. अगदी 10 ते 15 वर्षांच्या मॅच्युरिटी काळापर्यंत आपल्याला थांबावं लागतं. मॅच्युरिटी पिरेडनंतर आपल्याला जी रक्कम मिळते तेव्हा ती आजच्या तुलनेमध्ये कमीच वाटते.
महागाईचा थेट परिणाम बचतीवर होत असतो :
समजा तुम्ही सध्याच्या घडीला 15 वर्षांपूर्वी जेवढ्या पैशांमध्ये किराणा सामान खरेदी करत होता तेवढ्याच पैशांत आज सामान्य येते का? तर उत्तर आहे अजिबात नाही. मागील 15 वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात महागाईला जोर चढला आहे आणि म्हणूनच महागाईमुळे पैशांचे मूल्य कुठेतरी कमी होते हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर, समजा तुमच्या खात्यामध्ये सध्याच्या घडीला 1 कोटी रुपये जमा आहेत. परंतु येत्या दहा वर्षांमध्ये या एक कोटीचा मूल्य महागाईच्या हिशोबाने सुमारे 55 लाख रुपयांत इतकं होईल. ज्यामुळे भविष्यातील गरजा हव्या तशा पूर्ण होऊ शकणार नाहीत. हे उदाहरण महागाईवर होणारे परिणाम स्पष्टपणे दर्शवते.
पैशांचे मूल्य कमी होण्यामागचे कारण :
प्रत्येक वर्षी महागाईला चांगलाच जोर चढतो. म्हणजेच येणाऱ्या काळाबरोबर पैशांचे मूल्य कमी होत जाते. समजा साध रोजच्या वापरातील खाण्याच्या गोष्टींचं मूल्य 150 रुपये आहे. मागील पाच वर्षांमध्ये हेच मूल्य 70 रुपयांपर्यंत होते आणि येणाऱ्या दहा वर्षांमध्ये हे मूल्य थेट 300 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. महागाईचा परिणाम सर्वच गोष्टींवर स्पष्टपणे पाहायला मिळतो. सोने, चांदी, मालकी जमिनी, प्रॉपर्टी यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
आणखीन एक सांगायचे झाले तर, समजा तुम्ही दहा वर्षांपूर्वी 500 रुपयांमध्ये तीन ते चार वस्तू खरेदी करत असाल परंतु सध्याच्या काळा 500 रुपयांमध्ये फक्त एकच वस्तू खरेदी करता येते. यामुळेच पैशांचे मूल्य अगदी स्पष्टपणे कळून येते.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		