
MY EPF Money | केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मंडावी यांनी बऱ्याच दिवसांआधी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची घोषणा केली होती. ज्या कर्मचाऱ्यांना सध्या 15,000 हजार रुपये पगार मिळत आहे त्यांना थेट 21,000 हजार रुपये दरमहा मिळतील.
पीएफ खात्यातून काढता येतील 1,00,000 रुपये :
ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या ईपीएस आणि ईपीएफचे पैसे जमा केले जातात. हा पैसा त्यांच्या रिटायरमेंटकरिता जमा करण्यात येतो. जेणेकरून कर्मचाऱ्याला उतार वयात कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. दरम्यान ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या सुविधेकरिता वेगवेगळ्या नियमांची घोषणा करत असते.
50 नाही तर काढू शकता 1,00,000 रुपये :
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी आधीच्या नियमानुसार 50,000 एवढी रक्कम काढण्याची अनुमती होती. परंतु आता तुम्ही 50 नाही तर 1 लाख रुपयांची रक्कम काढून घेऊ शकता. तुम्ही हे पैसे आपत्कालीन घटनांसाठी त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या कारणांसाठी वापरू शकता.
पैसे काढण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल झाले :
मंत्री मंडवीया यांनी ईपीएफओच्या नियमांची घोषणाबाजी करतात. त्यांनी पैसे काढण्यासाठीचे काही नियम सांगितले. यामध्ये त्यांनी सांगितलं की, कोणताही कर्मचारी नवीन नोकरी लागण्याच्या पहिले 6 महिन्यांआधीच पीएफचे पैसे काढू शकतो. मंडावीया असं देखील म्हणाले की, हे पैसे तुमचे आहेत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कसे काढता येईल याची आम्ही काळजी नक्कीच घेऊ. ग्राहकांच्या समस्येला कुठेतरी कमी करण्यासाठी नवीन डिजिटल जुगलबंदी करण्याचा विचार सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी 6 महिन्याचा मळ्याची वाट पहावी लागणार नाही.
भविष्यात निधी नियमांचं काय होणार :
मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार ते लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीविषयी ॲक्शन घेणार आहेत. सध्याच्या घडीला 15000 रुपये पगार घेणारे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले पाहिजे. मंडावीया यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आता 15 नाही तर, 20 हजार मासिक पगार मिळणार.
वर्तमान भविष्य निधी प्रणाली :
ईपीएफ त्याचबरोबर इतर प्रावधान 1952 अंतर्गत 20 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना भविष्य निधीमध्ये योगदान देणे गरजेचे आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकूण 12% कापले जातात. कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्या एवढेच योगदान नियोक्ता आणि कंपनीकडून होत असते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.