 
						Property Buying | प्रत्येक व्यक्ती कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करताना त्या गोष्टीबद्दल सर्व माहिती त्याचबरोबर त्या मौल्यवान वस्तू गुंतवणूक करायची की नाही, आपल्याला या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे की नाही अशा शुल्लक प्रश्नांची उत्तरं नक्कीच शोधतो. दरम्यान घराचं देखील असंच. एखादी जमीन, घर, प्रॉपर्टी किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना देखील व्यक्ती 100 वेळा विचार करतो.
फ्लॅट, घर, जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी
फ्लॅट किंवा घर खरेदी करणे ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला जोखीम पत्करावी लागू शकते. दरम्यान घर किंवा मालमत्ता खरेदी करताना काही व्यक्तींकडून छोट्या मोठ्या चुका होऊन बसतात. परंतु या लहान चुका तुम्हाला भविष्यात चांगल्याच महागात पडू शकतात. आज आपण प्रॉपर्टी खरीददारीविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
मालमत्ता खरेदी करण्याआधी या गोष्टीची पडताळणी नक्की करा :
1. तुम्ही कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याआधी तेथील रहिवाशांना भेट द्या. त्यांच्याकडून एरिया बाबतची संपूर्ण माहिती काढून घ्या. एवढंच नाही तर प्रॉपर्टीच्या सरासरी दरांविषयी देखील माहिती काढा आणि घर खरेदीसाठी विकासकाबरोबर चांगली डील बनवा.
2. बरेच घरमालक आणि डेव्हलपर्स दिवाळी सारख्या सणासुदींच्या काळामध्ये अनोख्या ऑफर्स ठेवतात. तुम्ही घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर या ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता.
3. त्याचबरोबर तुमचे मित्र परिवार आणि ओळखीच्या व्यक्तींनी खर खरेदी केलं असेल तर, त्यांच्याशी संपर्क साधा. घर खरेदीसाठी कोणकोणते व्यवहार केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती विचारा. लक्षात ठेवा संपूर्ण माहिती तुम्हाला केवळ ओळखीचा आणि विश्वासहार्य व्यक्तीचं सांगू शकतो.
4. सध्याच्या घडीला फ्लॅटच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. समजा तुम्ही मोठ्या घराच्या मोहात पडून घर खरेदी केलं तर, तुमच्यावर भविष्यात कर्जबाजारी होण्याशी वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला केवढे मोठे घर हवे आहे याची गरज निश्चित करा आणि मगच त्यानुसार घर खरेदी करा.
5. घर खरेदी आणि विक्री करताना तुम्ही एजंटचा सल्ला घेऊ नका. किंवा कोणत्याही एजंटला या व्यवहारात पडू देऊ नका. असं केल्याने तुमचे कमिशनचे पैसे देखील वाचतील. तुम्ही थेट घर मालकाशी व्यवहार करू शकता.
6. तुम्ही एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पात घर बुक करण्याचा विचार करत असाल तर, विकासकाने कायदेशीर सर्व परवानग्या घेतले आहेत की नाही हे चेक करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		