
Property Knowledge | सध्याच्या घडीला मार्केटमध्ये घर, जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करणे अत्यंत रिस्की काम बनले आहे. कारण की प्रॉपर्टीचे मूळतः दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे ‘रेडी टू मूव्ह’ प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ प्रॉपर्टी. दोन्हीही वेगवेगळे प्रकार असल्यामुळे बरेचजण फसवा फसवीची कामे देखील करतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याही खोट्या गोष्टीला बळी न पडता योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी कोणती खास काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
प्रॉपर्टीमधील सुविधा :
तुम्ही एखादं घर किंवा एखादा प्लॉट खरेदी करत असाल त्याचबरोबर तुम्ही व्यवसायासाठी देखील एखादी जागा खरेदी करत असाल तर, सर्वप्रथम त्या जागेची संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्या जागेचा लाईट बिल, पाणी, आजूबाजूची दुकानं, गरजेच्या आणि सोयीच्या गोष्टी त्या सर्व व्यवस्थित आहेत की नाही हे नक्की तपासा.
प्रॉपर्टीवरील मालकी हक्क :
प्रॉपर्टी खरेदी करताना संबंधित प्रॉपर्टीवर कोणाचा मालकी हक्क आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीचा मालकी हक्क आहे त्याच्याकडे कायदेशीररित्या घराची सर्व कागदपत्रे तर आहेत ना या सर्व गोष्टींची खात्री करून घ्या. जर तुम्हाला आपण होऊन या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही थेटर रेवेन्यू ऑफिसमध्ये जाऊन अधिकृत गोष्टींची जाचपडताळणी करू शकता.
प्रॉपर्टीच्या कालावधीबद्दल देखील माहित करून घ्या :
तुम्ही खरेदी करत असणारी प्रॉपर्टी जुनी असेल तर, नवीन प्रॉपर्टीच्या तुलनेत तिची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी असेल. त्यामुळे गल्लत होण्याआधीच तुम्ही प्रॉपर्टी किती जुनी आहे. तिचा नेमका कालावधी किती या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती करून घ्या. तुम्हाला या गोष्टींबद्दल काही समजत नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या इंजिनियरला जाऊन भेट द्या आणि त्यांची मदत देखील घ्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.