14 February 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

Property Registration | जमीन किंवा घराची नोंदणी करताना किती शुल्क आकारण्यात येते, अशी ठरते मालमत्तेची फी, लक्षात ठेवा

Property Registration

Property Registration | बऱ्याच व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी करतात. प्रॉपर्टी म्हणजेच एखादी मालमत्ता खरेदी करताना त्या मालमत्तेची नोंदणी करणे अत्यंत गरजेचे असते. कारण की नोंदणी केल्यानंतरच जी काही प्रॉपर्टी असेल ती तुमच्या नावावर होते म्हणजे तुमच्या हक्काची प्रॉपर्टी होते.

नोंदणी करताना दोन्हीही पक्ष नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करार करून घेऊ शकतात. त्याचबरोबर सरकार तुमच्याकडून रजिस्ट्री शुल्क देखील आकारेल. आता रजिस्ट्री म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर, रजिस्ट्री म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला रजिस्ट्री असे म्हणतात.

अशा पद्धतीने ठरते नोंदणी शुल्क :
तुम्ही मालमत्तेवर केलेला नोंदणी खर्च सरकार तुमच्याकडून स्टॅम्पद्वारे लिहून घेते. दरम्यान नोंदणी करताना होणारा वायफळ खर्च म्हणजेच मुद्रांक खर्च. ज्या पद्धतीची जमीन असते त्या पद्धतीने मुद्रांक खर्च घेतला जातो. उदाहरणार्थ, गावामध्ये जमीन खरेदी करताना कमी आणि शहरामध्ये जमीन खरेदीसाठी जास्त पैसे घेतले जातात. हे मुद्रांक शुल्क जमिनीच्या रेटनुसारच भरावे लागते.

जाणून घ्या मुद्रांक मूल्याचे खर्च :
मुद्रांकाचे पैसे हे राज्य सरकारकडून ठरवण्यात येते. त्यामुळे ते देशभरात वेगवेगळे असू शकते. मुद्रांक शुल्क हे मालमत्तेच्या मूल्याच्या दहा ते तीन टक्क्यांपर्यंत आहे. त्याचबरोबर मुद्रांक शुल्काबरोबर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी देखील शुल्क भरावे लागते. तुमचे हे शुल्क केंद्र सरकारकडून आकारण्यात येते. जे मार्केटमधील मूल्याच्या 1% ने आकारले जाते.

60 लाखाच्या घरासाठी किती खर्च होईल :
समजा एखाद्या व्यक्तीला शहरी भागामध्ये 60 लाख रुपयांपर्यंत मालमत्ता खरेदी करायची असेल आणि तेथील मुद्रांक शुल्क 6% 5 ते 7 टक्के आहे तर, मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीला 3.6 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर 60,000 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क देखील भरावे लागेल. यामध्ये आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, तुम्ही महिलेच्या नावावर नोंदणी करत असाल तर पुरुषांपेक्षा कमी पैसे भरावे लागतील.

Latest Marathi News | Property Registration 23 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Property Registration(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x