 
						Salary Account Benefit | तुम्ही सॅलरी आणि सेविंग हे दोन प्रकारचे अकाउंट नक्कीच पाहिले असतील. सेविंग अकाउंट हे कोणताही सर्व सामान्य व्यक्ती स्वतःच्या नावाने उघडू शकतो. परंतु सॅलरी अकाउंट केवळ तोच व्यक्ती उघडू शकतो जो एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे.
सॅलरी अकाउंटवर विविध सुविधांचा लाभ
कारण की सॅलरी अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला कंपनीकडून तुमच्या खात्यातच सॅलरी पाठवली जाते. प्रत्येक महिन्याला क्रेडिट होणारे सॅलरी अकाउंट हे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या कंपनीद्वारेच उघडले जाते. सॅलरी अकाउंटवर तुम्हाला विविध सुविधांचा लाभ घेता येतो. आज आपण या सर्व सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.
लोन सुविधा :
सॅलरी अकाउंटमधून पर्सनल लोन घेणे अत्यंत सोपे असते. कारण की, प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात येणारी सॅलरी आणि तुमचे पैशांचे नियोजन पाहून बँक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते. यामध्ये सॅलरी अकाउंट आणि तुमचे स्टेटमेंट हेच एक परफेक्ट डॉक्युमेंट समजले जाते. या सुविधेमुळे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे काम देखील अतिशय सोपे होऊन बसते.
लॉकर चार्जवर पूर्णपणे सूट :
बहुतांश बँक सॅलरी अकाउंटवर लॉकर चार्जसाठी सूट देतात. जसं की एसबीआयच्या सॅलरी अकाउंटवर लवकर चार्जवर 25% सूट दिली जाते. त्याचबरोबर दोन किंवा अधिक महिन्यांपेक्षा जास्त दिवस कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन झाले नाही तर, तुमचा सॅलरी अकाउंट हे नॉर्मल अकाउंट सारखंच सुरू राहतं. सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला फ्री एटीएम ट्रांजेक्शनची सुविधा देखील मिळते.
फ्री-चेक बुकप्रमाणे मिळतात इतर सुविधा :
तुमच्या सॅलरी अकाउंटवर फ्री एटीएम ट्रांजेक्शन, फ्री चेक बुक, नेट बँकिंग सुविधा, पासबुक त्याचबरोबर झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा सॅलरी अकाउंटमध्ये मिळते. सेविंग अकाउंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलेन्सची सुविधा अजिबात मिळत नाही. यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलेन्स ठेवावाच लागतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		