 
						Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट हे असतेच. सॅलरी अकाउंट हे थेट कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाते. यामध्ये प्रत्येक महिन्याला त्याची सॅलरी क्रेडिट होत असते. बऱ्याच व्यक्तींना सॅलरी अकाउंट असून सुद्धा त्याचे नियम आणि सुविधांविषयी फारशी माहिती नाहीये. आज आम्ही या बातमीतून सॅलरी अकाउंटशी निगडित सर्वच गोष्टी उघड करणार आहोत.
इन्शुरन्स कवरेज :
बऱ्याच सॅलरी अकाउंटमध्ये कर्मचाऱ्यांना सॅलरी अकाउंटबरोबर इन्शुरन्स कवरेज त्याचबरोबर एक्सीडेंटल सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले जाते. यामध्ये ॲडिशनल सिक्युरिटी देखील असते. तुम्ही सुद्धा सॅलरी अकाउंट वापरत असाल तर, या गोष्टींची माहिती करून घ्या.
ओवरड्राफ्ट सुविधा :
सॅलरी खात्यामध्ये तुम्हाला ओवरड्राफ्ट बँकिंगची सुविधा देखील मिळते. ओवरड्राफ्ट म्हणजेच अडीअडचणीच्या काळी तुमच्या सॅलरी खात्यात पैसे नसतील तरीसुद्धा बँक तुम्हाला पैसे प्रदान करते. जेणेकरून तुम्ही कोणत्याही संकटकाळी अडकून राहिले नाही पाहिजे.
प्राथमिक सेवा :
बऱ्याच सॅलरी अकाउंट होल्डर्सला बँकेकडून प्रायोरिटी सर्विस दिली जाते. प्रायोरिटी सर्विस म्हणजेच प्राथमिक. ज्यामध्ये फास्ट सर्विस कस्टमर केअर नंबर आणि इतरही स्पेशल ऑफर्सचा समावेश असतो.
क्रेडिट कार्डचे ऑफर्स :
बऱ्याच बँका सॅलरी अकाउंट होल्डरला मोफत क्रेडिट कार्ड वापरण्याची संधी देते. ज्यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स शामील असतात. एवढंच नाही तर अन्युअल फीचा देखील समावेश असतो.
फ्री चेक बुक आणि डेबिट कार्ड :
कस्टमरला छोट्या मोठ्या खर्चासाठी वारंवार इकडे तिकडे जाण्याऐवजी थेट फ्री चेक बुक आणि फ्री डेबिट कार्ड देखील दिले जाते. ज्याच्या माध्यमातून कस्टमर कधीही आणि कुठेही पैसे देऊ शकतो.
मोफत एटीएम ट्रांजेक्शन :
सॅलरी अकाउंट असलेल्या होल्डर्सला मोफत एटीएम ट्रांजेक्शन दिले जाते. म्हणजेच तुम्ही कधीही आणि कुठेही गरजे वेळी कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस न देता पैसे काढू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला डिजिटल आणि शॉपिंग ऑफर्स त्याचबरोबर कॅशबॅक देखील मिळते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		