 
						Salary Vs Saving Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे कंपनीकडून असलेले बँक खाते असते. या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला व्यक्तीचा पगार येतो. दरम्यान कंपनीत काम करत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे स्वतंत्र बँक खाते मिळते. महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना पगार देण्याची वेळ येते तेव्हा बँका कर्मचाऱ्याच्या कंपनीच्या खात्यातून पैसे घेतात आणि कर्मचाऱ्यांच्या सॅलरी खात्यामध्ये ट्रान्सफर करतात. राहता राहिला प्रश्न म्हणजे सॅलरी आणि बचत खात्यामध्ये असा काय फरक आहे.
खाते उघडण्यामागचा हेतू काय सांगतो :
1. कर्मचाऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून प्रत्येक महिन्याला पगार येत असेल तर त्याला आपण सॅलरी खाते म्हणतो. सॅलरी खाते सेविंग खात्यापेक्षा थोडे वेगळे असते.
2. सेविंग खाते म्हणजेच बचत खाते हे सॅलरी खात्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळे असते. यामध्ये तुम्ही तुमच्या पैशांची बचत करत असता. त्याचबरोबर सॅलरी खाते आणि सेविंग खाते या दोघांच्या सुविधा देखील वेगवेगळ्या असतात.
व्याजदर :
बहुतांश बँका सॅलरी अकाउंट आणि सेविंग अकाउंट दोन्ही खात्यांवर समान व्याजदर देते. यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात व्याजदर मिळणार हे पूर्णपणे तुमच्या बँकेवर त्याचबरोबर तुम्ही कोणत्या खात्याची निवड करत आहात यावर देखील अवलंबून असते.
किमान शिल्लक :
1. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बचत खात्यामध्ये पैसे ठेवले नाहीत तर, बँक तुमच्याकडून चार्जेस आकारते. त्याचबरोबर बचत खात्यामध्ये तुम्हाला 0 बॅलेन्स अमाऊंटची सुविधा मिळत नाही.
2. सॅलरी खाते हे सेविंग खात्यापेक्षा परवडणारे असते. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात पगार तर येतोच. परंतु कर्मचारी आपला संपूर्ण पगार काढून घेऊ शकतो. सॅलरी खात्यामध्ये तुम्ही 0 बॅलेन्सची सुविधा अनुभवू शकता. तुमच्या खात्यात किमान शिल्लक नसली तरीसुद्धा बँक तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे पेनल्टी चार्ज घेणार नाही.
महत्त्वाचं :
समजा तुम्ही सॅलरी अकाउंट वापरत आहात आणि तुमच्या खात्यात गेल्या 3 महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा पगार आलेला नाही तर, तुमचे हे सॅलरी खाते सेविंग खात्यात आपोआप कन्व्हर्ट केले जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		