
SBI FD Interest Rate | फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय ठरला आहे. एफडी गुंतवणूक योजनांमध्ये महिला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पैसे गुंतवतात. FD गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला जातो. देशातील अनेक लोकप्रिय बँकांमध्ये काही स्पेशल एफडी योजना सुरू झाल्या असून अनेक लोकांनी आतापर्यंत गुंतवणूक करून बंपर परतावा मिळवला आहे.
आज या बातमीपत्रातून आपण 444 दिवसांच्या FD योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँक, इंडियन ओवर सिरीज बँक आणि फेडरल बँक या 3 बँकांच्या ग्राहकांना 444 दिवसांच्या स्पेशल एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. या तिन्ही बँकांमध्ये 444 दिवसांची स्पेशल एफडी योजनेमध्ये 2, 4 आणि 6 लाखांच्या FD गुंतवणुकीवर किती परतावा मिळणारे हे जाणून घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया 444 दिवसांची एफडी योजना :
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेला ‘अमृत कलश एफडी’ योजना या नावाने ओळखलं जातं. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी एसबीआय बँकेच्या अमृत कलश एफडीमध्ये पैसे गुंतवले आहेत. या एफडी गुंतवणुकीमध्ये 7.25 टक्के दराने परतावा मिळतो. समजा तुम्ही या योजनेमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली तर, 2,18,267 रुपये परत मिळतील. 4 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना 436,534 आणि 6 लाखांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना 6 लाख 54 हजार 801 रुपये मिळतात.
फेडरल बँक 444 दिवसांची एफडी योजना :
फेडरल बँक ही देखील लोकप्रिय बँकिंग पैकी एक आहे. या बँकेत 444 दिवसांच्या एफडी योजनेवर 750% दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये 2 लाख गुंतवले असता, 2 लाख 18 हजार 919, 4 लाख गुंतवले असता 4 लाख 37 हजार 839 रुपये आणि 6 लाख रुपये गुंतवले असता 6 लाख 56 हजार 759 रुपये परत मिळतील.
इंडियन ओवरसिरीज बँक 444 दिवसांची एफडी योजना :
इंडियन ओवरसिरीज बँकेत 444 दिवसांची FD करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.30% दराने व्याजदर प्रदान केले जाते. या योजनेमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली असता 2 लाख 18 हजार 397 रुपये, 4 लाख रुपये गुंतवले असता 4 लाख 36 हजार 795 हजार रुपये आणि 6 लाखांची रक्कम गुंतवली असता 6 लाख 55 हजार 192 रुपये परत मिळतील.