
SBI Vs Post Office | जेव्हा पैसे गुंतवणुकीची वेळी येते तेव्हा साहजिकपणे कोणताही व्यक्ती सरकारी बँकेच्या शोधात असतो. कारण की सरकारी बँक तुम्हाला पैसे कुठेही न जाण्याची गॅरंटी देते. 100% सुरक्षा त्याचबरोबर सर्वाधिक परतावा मिळत असल्यामुळे बरेच व्यक्ती सरकारी बँकांमध्ये एफडी करण्यास वळले आहेत. दरम्यान तुम्ही पोस्टामध्ये देखील पैसे गुंतवू शकता. कारण की पोस्ट ऑफिस हे देखील एक सरकारी योजनांमध्ये मोडते.
तुमच्यासमोर सरकारचे बँक आणि पोस्ट ऑफिस असे दोन्हीही ऑप्शन असतील तर, तुम्ही नेमकी कुठे गुंतवणूक करायला हवी हे आज आम्ही या बातमीपत्रातून सांगणार आहोत. ज्यामध्ये सरकारी बँकांपैकी एसबीआय बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीचा जास्त फायदा कुठे होईल जाणून घ्या.
पोस्टाच्या एफडी मिळवेल चांगला परतावा :
तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्टाची टीडी म्हणजेच टाईम डिपॉझिट योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही योजना 5 वर्षांसाठी उपलब्ध असते. तुम्ही या योजनेत 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू करून 2 लाखांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. ही योजना वार्षिक आधारावर 7.5% व्याजदर देते. त्यामुळे तुम्ही व्याजदराने जास्त पैसे कमवता. पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये मॅच्युरिटीपर्यंत व्याजदरानुसार 2,89,990 रुपये मिळतील.
एसबीआयची एफडी मिळवेल एवढा परतावा :
ग्राहकांचा शंभर टक्के विश्वास असलेली आणि देशातील गव्हर्नमेंट बँकांपैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली बँक म्हणजे एसबीआय बँक. एसबीआय बँकेत तुम्ही 5 वर्षांची एफडी करू शकता. यामध्ये तुम्ही 2 लाखांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. एसबीआय ची एफडी तुम्हाला वार्षिक आधारावर 6.5% व्याजदर देते. म्हणजेच व्याजदर पकडून मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 2,76,084 रुपये होतील. तसं पाहायला गेलं तर पोस्टाची टीडी तुमच्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरू शकते कारण की तिथे तुम्हाला एक टक्क्याने जास्त व्याज मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.