
Top up Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर हवं असत. यासाठी जो तो आपल्या घरासाठी प्रचंड मेहनत घेतो. त्याचबरोबर महागाईच्या वाढत्या काळामध्ये फार कमी व्यक्ती पैसे देऊन स्वतःचं घर खरेदी करतात. बहुतांश व्यक्ती गृह कर्जाचा पर्याय निवडतात. कारण की गृह कर्ज फेडण्याची प्रोसेस लांबलेली असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला बजेटनुसार एक ठराविक रक्कम व्यक्ती ईएमआयसाठी बाजूला काढून ठेवू शकतो.
महत्वाची गोष्ट म्हणजे लॉंग टर्म होम लोनमध्ये तुम्हाला जास्तीचे व्याजदर देखील भरावे लागते. त्यामुळे लोन घेण्याआधी सर्वप्रथम सर्व प्रकारच्या बँकांमध्ये जाऊन व्याजदर तपासून घ्या आणि मगच होम लोन घेण्याचा विचार करा. त्याचबरोबर पर्सनल लोन घेण्याऐवजी तुम्ही टॉप अप होम लोन देखील घेऊ शकता. टॉप अप होम लोनविषयी फार कमी व्यक्तींना ठाऊक आहे. टॉप अप होम लोनचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये कमी व्याजदराचा लाभ उचलता येतो.
टॉप अप होम लोन विषयी काही खास गोष्टी जाणून घ्या :
1. समजा तुम्ही होम लोनसाठी टॉपअप होम लोन घेतलं तर, गृहकर्जाव्यतिरिक्त होणाऱ्या खर्चांना आळा बसेल. इतर सर्व खर्च टॉप होम लोन पूर्ण करू शकेल.
2. तुमच्या गृह कर्जाला मॅनेज करण्याचं काम टॉप अप होम लोन करते. सर्वसामान्य व्यक्तींसाठी टॉप अप होम लोनचे ऑप्शन एक ऑपॉर्डेबल ऑप्शन ठरू शकते.
3. टॉप अप होम लोनची खासियत म्हणजे ग्राहक एकदा होम लोन घेतलेलं असेल तरीसुद्धा दुसऱ्यांदा होम लोनसाठी अप्लाय करू शकतो मी होम लोन प्राप्त करू शकतो.
4. टॉप अप होम लोन घेणे तुमच्यासाठी आणखीन एका गोष्टीसाठी फायदेशीर ठरू शकते ते म्हणजे तुम्ही रीपेमेंटसाठी कमीत कमी कालावधी निवडता तेव्हा याचा उपयोग होतो.
5. टॉप अप होम लोनचा कार्यकाळ वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिला जातो. अशातच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहक कर्जदारांना 30 वर्षांचा टॉपअप होम लोन देण्यात येतो.
6. टॉप होम लोन आणि होम लोन या दोन्हीही होम लोनच्या मध्ये केवळ 1 ते 2% टक्क्यांचा फरक पाहायला मिळतो.
7. तुम्हाला टॉपअप होम लोनसाठी योग्यता मिळवायची असेल तर, एकही महिना न वगळता सलग 12 महिने EMI पेमेंट करावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.