23 September 2021 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

चाकरमानी कोकणात निघाला | तिकडे दापोलीसहित अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात

Rain Update

रत्नागिरी, ०७ सप्टेंबर | दापोलीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून शहरातील विविध ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दापोलीतीलकेळकर नाका, शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात सुमारे पाच फुटाने पावसाचे पाणी वाढल्याने अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात एनडीआरएफचे २५ जवान आणि ४ बोटीसह पथक दाखल झालेले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

चाकरमानी कोकणात निघाला, तिकडे दापोलीसहित अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात – Again heavy rain started in Konkan weather report :

रात्री एक वाजेपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पूर परिस्थिती कायम होती. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी झाला आहे. चिपळुणमध्येही (Ratnagiri Rain) रात्रभर पाऊस कोसळत होता. सध्या चिपळूणमध्ये पाऊस थांबलेला आहे. पाणी पुन्हा घरांमध्ये शिरतं की, अशी परिस्थिती झाल्यामुले नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. काही तास पावसाची रिपरिप सुरू राहणार असल्याने समुद्राच्या भरतीवेळी पाणी शहरात शिरण्याची सक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारली होती. मात्र, पुन्हा त्याचं आगमन झालेले आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबई, ठाणे या शहरांमध्येही मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस कोसणार असल्याची शक्यता आहे.

मंगळवारी समुद्रकिनारी पुन्हा एक बोट बुडाली आहे. यापूर्वी एक दिवस अगोदर आंजर्ले येथे एक बुडाली होती. त्या बोटीला वाचविण्यासाठी गेलेली बोट गाळात रुतून बसली. मात्र, ती बोट वाचली. आंजर्लेनंतर हर्णेत एका बोटीला जलसमाधी मिळाली आहे.मच्छीमारांकडून बोट वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर बोटीला जलसमाधी मिळाली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Again heavy rain started in Konkan weather report.

हॅशटॅग्स

#WeatherForecast(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x