मुंबई, २२ ऑगस्ट | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा मुरूड मधील बंगला तोडण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. CRZ नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याचा मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करून कारवाईची मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडण्यास सुरुवात (Demolition of Milind Narvekar’ bungalow located in Dapoli) :

दापोली मधील मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर हा नार्वेकर यांचा हा बंगला आहे. नार्वेकरांच्या बंगल्या सोबतच अन्य देखील बंगल्यांचा यामध्ये समावेश आहे, ज्याबद्दल तक्रार करण्यात आलेली आहे. तर, बंगला पाडण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर ”करून दाखविले ! मिलींद नार्वेकरांचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार.” असं किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. (Demolition of Milind Narvekar’ bungalow located in Dapoli)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Demolition of Milind Narvekar’ bungalow located in Dapoli news updates.

VIDEO | मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांचा बंगला तोडण्यास सुरुवात