14 December 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

विनायक राऊत! तुम्हालाही चपलेने मारू', भाजप या नेत्याचा इशारा

Shivsena MP Vinayak Raut, BJP Leader Pramod jathar, Chappal, Nanar Refinery Project

रत्नागिरी: नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. दोन दिवस आधी शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिला होता. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं होतं. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला होता.

मात्र, काल दुपारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ बोलविण्यात आलेल्या मेळाव्याला हजारो लोक उपस्थित राहिले होते. यामध्ये अनेक जणांनी शिवसेनेची भगवी टोपी, गमछा घातला होता. यामुळे खासदारांचे आदेशच शिवसैनिक मानत नसल्याचे चित्र काल राजापूरमध्ये दिसले. मेळाव्यासोबत सत्यनारायणाची पूजाही आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती.

मात्र त्यानंतर थेट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनाच धमकी देण्यात आली आहे. भगवा अंगावर असलेल्या कुठल्याही शिवसैनिकाला किंवा भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केलीत तर विनायक राऊत तुम्हालाही चपलेने मारू, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. या विधानामुळे सध्या कोकणातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या आक्रमक विधानाला कोकणात नाणार प्रकल्पावरून सुरु असलेल्या वादंगाची पार्श्वभूमी आहे.

 

News English Summery: BJP leader Pramod Jathar has strongly criticized Shiv Sena MP Vinayak Raut, saying that if you beat up any Shiv Sena or BJP activist in the saffron party, Vinayak Raut will kill you too. With this statement, the political climate of Konkan is currently heating up. This offensive statement is the backdrop to the ongoing controversy over the Nanak project in Konkan.

 

News English Title: Story we will bit you by chappal says BJP Leader Pramod jathar who support Nanar Project warn to Shivsena MP Vinayak Raut.

हॅशटॅग्स

#Vinayak Raut(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x