Marathi Vadhu Var Suchak : लग्नकार्य हा महत्वाचा विषय जसा वधू वरांसाठी अत्यंत चिंतेचा विषय, तसेच पालकांसाठी सुद्धा लग्न प्रक्रिया कमालीची गुंतागुंतीची असते. लग्न करणाऱ्या दोन जीवांसोबत त्यांच्या कुटुंबासाठी देखील लग्नकार्याची प्रक्रिया सहजसोपी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील ‘मराठी वधू वर सूचक’ मंडळाने MarathiVadhuVarSuchak.com या खास वेबसाईटमार्फत ऑनलाईन सेवा सुरु केली आहे.

नोकरीच्या निमित्ताने तरुण तरुणींचा दिनक्रम अत्यंत व्यस्त

सध्या नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने तरुण-तरुणींना कोणत्याही वधू वर सूचक मंडळाच्या कार्यालयांना भेट देणं शक्य होत नाही. नोकरीच्या निमित्ताने तरुण तरुणींचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो. परिणामी, आठवड्यातून मिळणाऱ्या एका सुट्टीचा दिवस देखील ते एखाद्या वधू-वर केंद्राला भेट देऊन गमावतील अशी शक्यता कमी असते. आणि हे देखील लग्नकार्य अधिक लांबण्यासाठी अनेक कारणांपैकी एक कारण ठरतं.

उत्तम व्यवसाय करणाऱ्या स्थळाचा मुली किंवा त्यांचे पालक विचार करत नाहीत असं का?

सध्याच्या सुशिक्षित मुला मुलींच्या लग्नाची चिंता पालकांनी खरंच करावी का? करावी तर किती करावी? आलेल्या स्थळांच्या पत्रिका पाहण्याला किती महत्व द्यावे? लग्नानंतर विवाहित मुलींनी तिच्या आई-वडिलांची आर्थिक जवाबदारी उचलावी का? उत्तम व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या स्थळाचा मुली किंवा त्यांचे पालक विचार करत नाहीत असं का?

Marathi vadhu var suchak trusted matrimony

समोरच्याला समजून घेण्यासाठी अधिक वेळ घ्यावा का?

तसेच एखाद स्थळ पसंत आल्यास आणि पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर समोरच्याला समजून घेण्यासाठी अधिक वेळ घ्यावा का? लग्न करताना वधू-वरांमधील अंतर किती असावे? तसेच अनेक वधू-वर केवळ फोटो पाहूनच निर्णय घेतात, ते योग्य आहे का? समोरच्या स्थळाकडून कोणताही प्रतिसाद किंवा निर्णय कळवला जात असेल तर किती वेळ वाट पाहावी? असे एक ना अनेक प्रश्न विवाह इच्छुक वधू-वरांना आणि त्यांच्या पालकांना सतावत असतात.

या सर्व प्रश्नांची उत्तरं इच्छुक वधू-वरांना आणि त्यांच्या पालकांना मिळाली तर कदाचित आयुष्याचा योग्य जोडीदार निवडीची निर्णय प्रक्रिया देखील सुखद होऊ शकते. या सामाजिक विचारानेच मराठी वधू वर सूचक डॉटकॉमची स्थापना करण्यात आली आहे.

लग्नप्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘मराठी वधू वर सूचक’ मंडळाची खास ऑनलाईन सेवा