5 May 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

त्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर यांची काय लायकी राहिली असती - निलेश राणे

Nilesh Rane

मुंबई, ०७ जून | भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करण्याचा सपाटा लागल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला चंद्रकांत पाटील रोज नवनवी विधानं करून अजित पवारांना लक्ष करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी तिखट शब्दात प्रतिउत्तर दिल्यावर भाजपचे इतर नेते देखील संतापल्याचं पाहायला मिळतंय.

आता भाजपचे राज्य सचिव निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. अजित पवार यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला.

निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना खडेबोल सुनावले. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

News English Summary: BJP leader Nilesh Rane has lashed out at Ajit Pawar if he had not taken him home after the swearing in ceremony. Ajit Pawar had targeted Narendra Patil, who was holding a Maratha morcha on Sunday.

News English Title: BJP leader Nilesh Rane has lashed out at Ajit Pawar after targeting Narendra Patil news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x