23 September 2019 11:04 AM
अँप डाउनलोड

एसआरए घोटाळ्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून डच्चू?

Prakash Mehata, Devendra Fadanvis, BJP, SRA Scam

मुंबई : अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल सकाळी अकरा वाजता पार पडला. यात एकूण तेरा आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. १३ मंत्र्यांना सामावून घेताना फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आधीच्या एकूण ६ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे हे सहाही मंत्री भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या १०, शिवसेनेच्या २ नेत्यांना तर आरपीआय आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना मंत्रिपपदाची शपथ देण्यात आली.

मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक कंपनी एस. डी. कॉर्पोरेशन संबंधित एसआरए घोटाळ्यामुळे विरोधकांच्या रडारवर आलेले आणि राजकीय अडचणीत अडचणीत सापडलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह आदिवासी मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राजे अत्राम, प्रविण पोटे आदी सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

काल सकाळी राजभवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी १३ मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात ८ कॅबिनेट मंत्र्यांचा तर पाच राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उईके या सहा नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली तर शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत या दोघांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या