26 July 2021 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मराठा आरक्षण | मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपतींना पत्र, तर पंतप्रधानांची देखील भेट घेणार

Maratha reservation

मुंबई, ११ मे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती महोदयांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत:
मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो.. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे.. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवू.

आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने हा एकमताने निर्णय घेतला होता त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आज जसं राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ.

आज राष्ट्रपतींना पत्र दिलं आहे. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पहिली पायरी म्हणून राज्यपालांची भेट घेतली.आम्ही बोललो होतो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करु, ते आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केली आहे.

मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. त्यांनामाहिती आहे, ही लढाई सरकारविरोधात नाही, सरकारही सोबत आहे. या समाजाच्या मागणीविरोधात कोणताही पक्ष नाही… जो काही समजूतदारपणा दाखवला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो… सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे.

 

News English Summary: After the Supreme Court canceled the Maratha reservation, there was a lot of politics in the state. After that, now Chief Minister Uddhav Thackeray arrived at Raj Bhavan today to meet Governor Bhagat Singh Koshyari. He was accompanied by Deputy Chief Minister Ajit Pawar, Maratha Reservation Sub-Committee Chairman Ashok Chavan, Home Minister Dilip Walse Patil and Public Works Minister Eknath Shinde. During the meeting, Chief Minister Uddhav Thackeray handed over a letter to the President to the Governor. After that, the Chief Minister interacted with the journalists.

News English Title: CM Uddhav Thackeray handed over a letter to the President to the Governor regarding Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(199)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x