21 November 2019 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

काँग्रेसच्या १-२ आमदारांना भाजप नेत्यांकडून २५ कोटीची ऑफर मिळाली होती: नितीन राऊत

Congress leader Nitin Raut, BJP Maharashtra

मुंबई: १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व विधानसभा आमदार राजीनामा देतील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभुमीवर राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये आहेत. काँग्रेसचे नेते जयपूरला गेले आहेत. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.

शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांनाही भारतीय जनता पक्षाकडून फोन आले असून त्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, आमचे आमदार सुरक्षित असून आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत यांनी देखील भाजपचे नेते काँग्रेसच्या एक दोन आमदारांकडे २५ कोटीची ऑफर घेऊन आल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे.

आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने फोडाफोडी केली, परंतु जनतेने हे सहन केले नाही. भारतीय जनता पक्ष जनतेशी बेईमानी करते आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र माफ करणार नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली तर ते पाप भारतीय जनता पक्षाचं असेल यात काहीही शंका नाही असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाने एकदा समोर येऊन सांगावं की आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही. भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(350)#Congress(301)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या