13 May 2021 8:41 AM
अँप डाउनलोड

लक्ष ठेवा | भाजपकडे गेलेले आमचे कधी राजीनामा देतील | आणि आमच्याकडून निवडून येतील

Deputy CM Ajit Pawar, BJP, MLAs return, NCP

मुंबई, १५ डिसेंबर: विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी केंद्र सरकारने 30 हजार 537 कोटी अजून दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. सरकार आणि जनता मिळून कोरोनात चांगलं काम करतंय. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जातोय. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या होत्या. नंतर मात्र प्रत्येक राज्याने हा खर्च करावा, असं सांगितलं. संकट मोठं होतं, उत्पन्न कमी झालं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

केंद्राकडून वेळेत निधी आला नाही. जे जे विधिमंडळाने मागितलं. त्यात कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगेटिव्ह प्रेशरसाठी 22 कोटी 26 लाख रुपये खर्च केले. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवासस्थानासाठी 8 कोटी रुपये दिलेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे. पदवीधर लोकांनी पराभव केला हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खूपच झोंबलं आहे, असं म्हणत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला.

‘तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने त्यांना दुःख झालं. हे सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल, पण ते गेलं नाही, वर्षात जाईल म्हणाले, पण तरीही गेलं नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते आमच्या पाच जागा येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल. पण निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबलं आहे. नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत,’ असं म्हणत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षामधल्या कथित गटबाजीवर बोट ठेवलं आहे.

‘पुण्यात चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते, पण आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. तीच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना भारतीय जनता पक्षाने तिथं घेतल्याने आली. अमरावतीला चुकलं, पण एक समाधान आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग… याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिलं आहे. आता मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाला लगावला.

 

News English Summary: He was saddened by the arrival of a three-party government. He was saying that the government will go in six months, but it has not gone, it will go in a year, but it has not gone yet. Now we were claiming in the Assembly elections that one of our five seats will come to power. But the results were different. Nagpur’s place was lost after so many years. It’s very scary to be defeated by the graduates. With the defeat in Nagpur, one group is very upset, ‘said Ajit Pawar, pointing to the alleged factionalism in the Bharatiya Janata Party.

News English Title: Deputy CM Ajit Pawar gave alert to BJP over MLAs return in NCP news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x