26 July 2021 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश

IPS officer Rashmi Shukla

मुंबई, ०६ मे : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोपही यावेळी शुक्ला यांनी केला होता. त्याचप्रमाणे, चौकशीकरिता दिलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी २९ एप्रिल रोजी दाखल केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ६ मे रोजी हैद्राबाद उच्च न्यायालयात सुनवाणी होणार पार पडली. रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेत चौकशी अधिकारी आपला छळ करत असल्याचा आरोप केला होता. या याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी हे आरोप केले आहेत.

मात्र आज झालेल्या सुनावणीत रश्मी शुक्ला यांनी न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. कारण यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची टीम थेट हैदराबादमध्ये जाऊन त्यांची चौकशी करेल असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या जबाबाची व्हिडिओ रेकॉडिंग होणार असल्याचं देखील दोन्ही बाजूने मान्य करण्यात आलं आहे.

दरम्यान, एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं होते. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं.

 

News English Summary: In the hearing, Rashmi Shukla has given a strong blow to the court. The court has directed the Mumbai Police Cyber Cell team to go directly to Hyderabad and investigate the matter. In particular, both sides have agreed that a video recording of their response will be made.

News English Title: IPS Rashmi Shukla phone tapping case hearing stated in high court news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(201)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x