ते म्हणाले 'आता बॉम्बस्फोट होत नाहीत'; मोदींना पुलवामात काय झालं ते अजून माहित नाही?
नगर : नगर : आता बाँबस्फोट होत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत आहे चौकीदार त्यांना कोठुनही शोधून काढील आणि शिक्षा करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये केले. काँग्रेस – एनसीपीच्या काळात दहशतवाद वाढला होता. देशात दररोज कुठे ना कुठे बाँबस्फोट होत होते. त्यात सामान्य लोकांचे बळी पडत होते. असं असलं तरी ३०० किलो आरडीएक्स’ने कारमधून बॉम्बस्फोट घडवून आणल्याने तब्बल ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले हे मोदींना अजून समजलं नाही का, अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
परंतु, आता भारत घरात घुसुन दहशतवाद्यांना मारत आहे आणि जगात भारताची प्रतिमा मजबूत झाल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी जाहीर सभेत सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता आम्हाला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही देखील देश विदेशी चष्म्यातून पाहू लागलात काय? असा प्रश्न विचारत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
जम्मू-काश्मीर’ला देशापासून वेगळं करण्याची आणि वेगळा पंतप्रधान करण्याची भाषा बोलणार्यांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता असल्याचे ते म्हणाले. तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रविरोधी भूमिका का? असे प्रश्न त्यांनी पवारांना विचारले आहेत.
Maharashtra supports development agenda of NDA. Speaking in Ahmednagar. https://t.co/gZbc1mxsGo
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 12, 2019
महत्त्वाचे मुद्दे;
- मागील पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो लोकांना पक्की घरे मिळाली. घरात लाईट आली. शौचालय आली. आणि एलपीजी गॅसही मिळाला
- 2014 च्या माझ्या नगर मधील सभेला आजच्या निम्मेच लोक हजर होते. आज काय कारण आहे एव्हढे लोक आलेत? तुमच्या या प्रेमाबद्दल मी आभारी आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील सभेच्या स्थळी कींवा स्टेजवर नाहीत.
- देश कोणत्या दिशेने जाणार हे तुम्ही ठरवणार आहात. भ्रष्टाचारी नामदार देश चालवणार की इमानदार चौकीदार देश चालवणार हे तुम्ही यावेळी मतदान करताना ठरवणार आहात.
- यावर काँग्रेसच्या भुमिकेचे मला आश्चर्य वाटत नाही. मात्र शरदराव को क्या हुवा है… अरे शरदराव..
- मागील पाच वर्षात महाराष्ट्रात लाखो लोकांना पक्की घरे मिळाली. घरात लाईट आली. शौचालय आली. आणि एलपीजी गॅसही मिळाला.
- पंतप्रधान कीसान सन्मान योजनेचा लाभ पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकर्यांना सध्या मिळत आहे. मात्र 23 तारखेनंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे.
- कोकणात जाणारे पाणी शेतीला देण्याचा प्रकल्प राबवला जाईल. फक्त पाण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन केलं जाईल. पण त्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार यायला हवे.
- जनतेतनेच आता नवीन नारा दिला आहे. काँग्रेस कायमसाठी हटवा. तरच देशातील गरीबी संपेल. काँग्रेस हटवा तरच सबका साथ सबका विकास होईल. काँग्रेस हटवा तरच भ्रष्टाचार संपेल.
- तुघलक रोड चुनावी घोटाळा हा काँग्रेसने नवीन घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात मध्य प्रदेश मधून पोती भरुन पैसे तुघलक रोडवरील बंगल्यात आले. – मध्य प्रदेशात आताच त्याचं सरकार आलं आहे. तरीही एव्हढे पैसे आले. काँग्रेसची सवय जातच नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News