23 September 2021 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? - अण्णा हजारे

Anna Hajare

अहमदनगर, २७ ऑगस्ट | देशातील राजकारणात काही वाद किंवा चर्चा सुरू झाल्यावर सर्वांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण येत असते. अशा वेळी आता अण्णा हजारे कुठे गेले असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. तसेच आता अण्णा हजारे हे झोपले आहेत का? अशी विचारणाही केली जाते. आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. ‘जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत’ असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? – Maharashtra peoples are sleeping like a Kumbhakarna what can I do alone said Anna Hazare :

गेल्या काही काळापासून अण्णा हजारे हे शांत आहेत. दरम्यान देश बचाव जन आंदोलन या समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी देशातील विषयांवर अण्णा हजारांनी भूमिका मांडावी अशी मागणी केली होती. त्यांनी भूमिका मांडली नाही तर आंदोलन करु असा इशारा देखील त्यांनी दिला होता. यानंतर अण्णा हजारे यांनी या समितीला चर्चेसाठी बोलावले होते. त्यांच्या भेटीदरम्यान अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी अण्णा हजारे यांनी देश बचाव जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आता माझे वय हे 84 वर्षे झाले आहे. देश बचाव जनआंदोलन समिती या तरुणांनी स्थापन केली आहे, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभारला तर मी त्यामध्ये नक्कीच सहभागी होईल असे आश्वासन देखील अण्णा हजारेंनी दिले. पुढे ते म्हणाले की, आपण यापूर्वी आंदोलने करुन लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करुन घेतले आहेत. मात्र आता सरकार बहुमताच्या जोरावर कोणतेही कायदे मंजूर करुन घेत आहे. मागणी नसताना हे कायदे मंजूर केले जात आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. यामुळे सरकार काहीही करु शकत आहे. जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली तरच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील’ असे अण्णा हजारे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra peoples are sleeping like a Kumbhakarna what can I do alone said Anna Hazare.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x