प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश | विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती
मुंबई, ०३ जून | प्रसिद्ध गायिका वैशाली माडेनं नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.
वैशाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. ही परिस्थिती बघून, वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आज ही प्रतीक्षा संपली आहे. आज वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर प्रवेश केला आहे. वैशालीचा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश झाला आहे. तसेच तिची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
वैशालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तिचं स्वागत केलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीट करत वैशालीला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात वैशालीला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागामध्ये प्रवेश तसंच त्यांची विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/fXevFShfZg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 3, 2021
News English Summary: Famous singer Vaishali Made has recently joined the NCP. Vaishali has joined the party in the presence of Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar, MP Supriya Sule, Minister Dhananjay Munde and other office bearers. Deputy Chief Minister Ajit Pawar has congratulated Vaishali by tweeting.
News English Title: Marathi Singer Vaishali Made join NCP party in the presence of Deputy CM Ajit Pawar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH