12 December 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्रद्रोहींना बोलण्याचा अधिकार नाही

Minister Vijay Wadettivar, BJP Maharashtra, PM Care Fund

पुणे, २ जुलै : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एकही पैसा अद्याप राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही असं ते म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे आवाहन करण्याऐवजी ज्या विरोधकांनी राज्यातील नेत्यांना, व्यवसायिकांना आणि नागरिकांना पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन केले, अशा महाराष्ट्रद्रोहींना राज्य शासनाच्या कारभारावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा कठोर शब्दांत वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला.

 

News English Summary: Instead of appealing for help to the Chief Minister’s Assistance Fund, the opposition leaders who appealed to the leaders of the state to help the Prime Minister’s Fund have no right to speak on the affairs of the state government.

News English Title: Minister Vijay Wadettivar Slams BJP Maharashtra over PM Care Fund News latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x