6 October 2022 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Tips To Reduce Dark Circles | महागड्या क्रिम्सने सुद्धा डोळ्याखालील डार्क सर्कल दुर होतं नाहीत?, नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा SBI ATM Rule | तुम्ही एसबीआय एटीएम वापरता?, रोख रक्कम काढली तर तुम्हाला 173 रुपये द्यावे लागतील असा मेसेज आला?
x

साताऱ्याचा प्रसाद चौगुले MPSC परीक्षेत राज्यात प्रथम

MPSC Exam, Competition Exam Study, UPSC, Police Bharti

मुंबई 19 जून : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ रोजी १७ फेब्रुवारी २०१९ ला मुंबईसह अन्य ३७ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरता ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. प्रस्तुत मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

एमपीएससीच्या निकालानंतर उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून १० दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

 

News English Summary: State Service Main Exam 2019 results have started. Prasad Chowgule has bagged the number one position in the state. Parwani Patil is the first among the girls. This was the largest batch of state service. There are 420 officers in this batch.

News English Title: MPSC Main Exam 2019 result Prasad Chowgule from Satara has bagged the number one position in the Maharashtra State News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x