14 May 2021 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
x

लोटसचं ऑपरेशन | अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये भाजपचा मोठा नेता फोडून स्पर्धक संपवले

Nanded Bhokar, BJP leader Nagnath Ghisewad, joins congress party, minister Ashok Chavan

नांदेड, ६ डिसेंबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाची राज्यातील दशा आणि दिशा दिसू लागली आहे. आमदार फुटले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीसमोर पुन्हा निवडून येणे जवळपास अशक्य असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील आमदारांना देखील मिळले असतील. मात्र भारतीय जनता नेते मंडळींना देखील त्या मिळाले असावेत. परिणामी भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस आता बारगळलं असलं तरी दुसऱ्या बाजूला ‘लोटसचच ऑपरेशन’ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाचे नेते नागनाथ घिसेवाड (BJP Leader Nagnath Ghisewad) यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (PWD Minister Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांच्या प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.

भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. आगामी काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे (Bhokar Municipal Council elections will be held in the near future). घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये काँग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचं नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध (Nagnath Ghisewad is known as a popular Bahujan leader in Nanded district) आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता. १९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत तर ते केवळ ५०० मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर २००४ च्या विधानसभेला ते केवळ २००० मतांनी मागे पडले. दोन्ही वेळा ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. तेव्हापासून बहुजन नेते अशी त्यांची ओळख झाली आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने नांदेडमधून भारतीय जनता पक्षाची काँग्रेससोबतची स्पर्धा संपल्यात जमा आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) leader Nagnath Ghisewad entered the Congress in the presence of veteran Congress leader and PWD Minister Ashok Chavan. The entry of Ghisewad, a well-known Bahujan leader, will be of great benefit to the Congress in Nanded.

News English Title: Nanded Bhokar BJP leader Nagnath Ghisewad joins congress party in presence of minister Ashok Chavan News updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x