4 December 2020 8:15 PM
अँप डाउनलोड

घरभर चिठ्ठ्या वाटणाऱ्या राष्ट्रीय नेत्याबद्दल मी काय बोलणार? : शरद पवार

Sharad Pawar, Chandrakant Patil

मुंबई: “राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आपल्याला PHD करायची इच्छा आहे” अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी ५० वर्ष राजकारण केलं. तरीही राष्ट्रवादीचे दहाच्यावर खासदार निवडून आलेले नाहीत. शरद पवार यांची दिल्ली निकालांवरील प्रतिक्रिया फारशी गंभीरतेने घ्यायची गरज नाही. शरद पवारांचे कधीच दहा पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले नसतानाही शरद पवार राजकारणाच्या केंद्रबिंदूत कसे काय राहतात? शरद पवार एकाच वेळी सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकत्रित कसे संवाद साधू शकतात? आपलं म्हणणं कसं पटवून देऊ शकतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे”, अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटलांनी केलीये.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गुरुवारी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा एकदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पवारांवर निशाणा साधला मात्र त्याचवेळी त्यांच्यावर पीएचडी करण्याचा मानसही व्यक्त केला. देशाच्या राजकारणाचा विचार करायचा झाला तर पवारांकडे केवळ पाच ते सहाच खासदार असतील, अशावेळी देखील राजकारण करणं पवारांना कसं जमतं याचं कुतूहल माझ्या मनात कायमच आहे असं ते म्हणाले होते.

त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसने ‘आम आदमी पक्षा’शी हातमिळवणी केली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चंद्रकांतदादांची खिल्ली उडवली. ‘दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी माझ्या वाचनात आलं, खरं खोटं माहित नाही. चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला. त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार’ असं म्हणत शरद पवार गालातल्या गालात हसले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जाहीरनाम्यात मोफत विषयांचा भडीमार करण्यात आला होता. दिल्ली निवडणुकीत धार्मिक तेढ निर्माण करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग भाजपकडे शिल्लक नव्हता. त्यात केजरीवाल यांना मिळणार प्रचारातील प्रतिसाद देखील मोठा होता. त्यामुळे भाजपने देशभरातील स्वतःचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यांचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री ते थेट स्वतः देशाचे गृहमंत्री देखील गल्ल्यांमध्ये पॅम्प्लेट वाटण्याचा सपाटा लावून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारताना दिसले होते आणि यावरून भारतीय जनता पक्षाची केजरीवाल यांनी केलेली दयनीय अवस्था सिद्ध झाली होती.

 

Web Title: NCP President Sharad Pawar answers Chandrakant Patil post Delhi Assembly Election result.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(78)#Sharad Pawar(322)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x