18 September 2021 9:51 PM
अँप डाउनलोड

फायदा भाजपला होणार मग तो खर्च भाजपच्या नावावर टाका, नेटिझन्सची तावडेंवर टोलेबाजी

Vinod Tawde, MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019

मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील ४८ पैकी ३७ ते ४० जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा घेत भाजपचा परावभ करण्याचे आवाहन केले होते. राज यांनी राज्यभरात दहा प्रचारसभा घेत धमाल उडवून दिली होती. त्यांच्या प्रचाराचा कॉंग्रेस आघाडीला लाभ होणार असल्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्‍त केली जात असतानाच राज ठाकरेंच्या या सभांचा भाजपलाच फायदा झाला असे विनोद यांनी म्हटले होते.

दरम्यान, निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांच्या मनसेला सभेचा एकूण खर्च दाखवण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे मंत्री विनोद तावडेंना नेटिझन्सनी समाज माध्यमांवर शाब्दिकरित्या झोडपण्यास सुरुवात केली आहे. नेटिझन्सच्या म्हणण्यानुसार जर फायदा भाजपाला होणार आहे असे विनोद तावडे यांनी याआधीच म्हटले असेल तर सर्व प्रचार सभांचा खर्च भाजपच्या नावावर टाकावा अशी फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x