5 August 2021 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
x

जळगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील बिनविरोध

Shivsena leader Lalita Patil

जळगाव, १० जुलै | जळगाव येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे जळगाव गाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. शासनाच्या विविध विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा असा सल्ला देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जळगाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता. यानुसार विद्यमान सभापती नंदलाल पाटील यांनी ठरल्यानुसार आपला राजीनामा दिला होता. यामुळे आज सभापती पदाची निवडणूक पिठासन अधिकारी तथा तहसिलदार नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ममुराबाद पंचायत समिती गणातून शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या सौ.ललिता जनार्दन पाटील (कोळी) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड विस्तार, अधिकारी एन. डी. ढाके, महेश जाधव आदींनी निवडणूक कामकाजास सहकार्य केले. यावेळी सभागृहात उपसभापती संगीताताई चिंचोरे, पंचायत समिती सदस्य ज्योतीताई महाजन, जागृतिताई चौधरी, विमलबाई बागुल, शितलताई पाटील, निर्मलाबाई कोळी, यमुनाताई रोटे, नंदलाल पाटील, हर्षल चौधरी आदी उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena leader Lalita Patil chairperson of Jalgaon Panchayat Samiti news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x