30 June 2022 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंना भर संसारातून कायमचे कोणी उठवले? - शिवसेना

Shivsena

मुंबई, २७ ऑगस्ट | महाराष्ट्राला ठाकरे आणि राणे संघर्ष तसा नवा नाही. आरोप प्रत्यारोप आणि जहरी टीकेपर्यंत असलेल्या या युद्धानं आता नवं रूप धारण केलं आहे. या दोघांमधला सामना आणि एकमेकांवरील प्रहार आता थेट कोर्ट कचेऱ्यांमध्ये रंगणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे शिवसेना विरुद्ध राणेंच्या संघर्षानं नवं वळण घेतलं आहे. आतापर्यंत भाषणांमधून टीका आणि रस्त्यावरचा राडा एवढ्यापुरती मर्यादित असलेली लढाई आता कोर्ट कचेऱ्यांमध्ये पोहोचली आहे. सामनातल्या अग्रलेखात याची झलक बघायला मिळाली.

श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंना भर संसारातून कायमचे कोणी उठवले? – Shivsena target Union minister Narayan Rane over his old political history :

सामनातून टीका:
नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरुन उठवणं वाईटच. पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भर संसारातून कायमचे कोणी उठवले? या प्रकरणांचा नव्याने तपास ठाकरे सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारुन पडण्याइतके सोपे नाही.’

आता धूळ बसलेल्या अनेक फाईली बाहेर येणार:
कायद्यानं धडा शिकवण्याची भाषा सुरू असतानाच संजय राऊत यांनी राणेंना गर्भित इशाराही दिला आहे. ‘तुम्ही केंद्रातील मंत्री आहात. आधी देश समजून घ्या. जे काम आहे ते करा. राज्यात येवून बकाल आणि बकवास बोलू नका. त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. अंगावर याल तर ही शिवसेना आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणे यांना इशारा दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे आणि केंद्रात भाजपचं. दोन्ही बाजूंनी आपापल्या यंत्रणा वापरून कारवायांचं सत्र सुरू होऊ शकतं. त्यामुळे आता धूळ बसलेल्या अनेक फाईली बाहेर येणार आणि महाराष्ट्रात नवा संघर्ष पेटणार की काय अशी शक्य़ता आहे. मात्र राजकारणात एक वाक्य महत्त्वाचं ‘जिनके घर शिशे के होते है, वो दुसरोंपर पत्थर नही फेका करते’.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena target Union minister Narayan Rane over his old political history news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(140)#Saamana(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x