15 December 2024 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

ठाकरे सरकारने २ महिने पगारच दिला नाही, उपासमारीला कंटाळून ST कर्मचाऱ्याची आत्महत्या

ST Mahamandal, employee commits suicide, Islampur, Mahavikas Aghadi

सांगली, ३१ जुलै : कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे बातमी समोर आली होती. मात्र, यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात ट्विट केलं होतं की, “करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील. यासंबंधी मीडियातून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती.

दुसरीकडे कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. तसेच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. त्यात गेले चार महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (३५) याचाही दोन महिने पगार झाले नव्हता. त्यामुळे तो संटकात होता. त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांगली जिल्ह्यातील पेठ येथील अमोल धोंडीराम माळी या एसटी कामगाराने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो इस्लामपूर आगारात मेकॅनिकल विभागात नोकरीस होता. त्याने आर्थीक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाउन काळात एसटी आगार चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाय्रांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

अमोल माळी याच्याच पगारावरच कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता. मात्र पगार न मिळाल्याने तो आणि पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. तो गेल्या काहि दिवसापासून आर्थिक संकटात होता. यातूनच त्याने आपली जिवन यात्रा संपवल्याची चर्चा आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, ५ वर्षांचा मुलगा, ३ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

 

News English Summary: ST Mahamandal service is also closed in the district. As ST has been closed for the last four months, many employees have not been paid. Amol Mali (35), a mechanic at Islampur depot, had not been paid for two months. So he was in trouble. He committed suicide by hanging himself with a sari at his home.

News English Title: ST Mahamandal employee commits suicide at Islampur News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x