12 December 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

जिल्हा नियोजन निधीतून ५० लाख उपलब्ध; आ. राजू पाटील कल्याण-डोंबिवलीसाठी तत्पर

Corona Crisis, Covid 19, Kalyan-Dombivli, MLA Raju Patil

डोंबिवली, २ एप्रिल : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी (ठाणे) यांच्याकडे केली होती. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असताना कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांचा समावेश असून अश्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था मिळून तयार झालेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात कोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य पुरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रासाठी २५ लाख, ठाणे महापालिका क्षेत्रासाठी १५ लाख आणि १४ गावांसाठी १० लाख असे सुमारे ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

सध्या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या क्षेत्रात मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतः लक्ष घालून विविध उपयोजना सुरू केल्या आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये फवारणीचे काम चालू झाले आहे आणि काही ठिकाणी धान्यवाटप पण चालू केले आहे.आमदारांसोबत मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्यापरीने मदतकार्य आणि समाजसेवा करत आहेत.

दरम्यान, कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्‍ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्‍णसंख्‍या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्‍णांपैकी ४ रूग्‍ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून ०१ रूग्‍ण कल्‍याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ०३ रुग्‍ण हे लग्‍न सोहळयाशी संबंधीत असून ०१ रूग्‍ण कोरोनाबाधित रूग्‍णाचा सहवासित आहे. नवीन रूग्‍णांपैकी कल्‍याण पुर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.

 

News English Summary: The outbreak of corona virus is increasing rapidly in the Kalyan Dombivali Municipal Corporation area of ​​Kalyan Rural Assembly. The District Planning Officer (Thane) had demanded immediate approval of the Rs. The corona virus is infected. While Maharashtra has the highest number of coronary patients, the number of patients in Kalyan Dombivali area is increasing. Therefore, MNS MLA Raju Patil had demanded immediate funding for medical equipment and materials to prevent the outbreak of the corona virus.

 

News English Title: Story Corona Crisis MNS MLA Raju Patil managing fund for fight against Covid 19 for Dombivli Kalyan Cities News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x