26 April 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मराठा आरक्षण | स्थगिती तात्काळ उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार | पुढील सुनावणी 25 जानेवारी

Supreme court of India, Maratha reservation, Mahavikas Aghadi

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगत घटनापीठाने हा स्थगिती उठवण्यास नकार दिला. तसेच यावर येत्या 25 जानेवारी रोजी पुढील सुनावणी करण्यात येणार असल्याचं घटनापीठाने स्पष्ट केलं आहे.

आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार ही लढाई सुरुच आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असं या घटनापीठने म्हटलं आहे.

मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडताना आरक्षणाचे वेगवेगळे पैलू, मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, आरक्षणाची गरज, संविधानिक वैधता आणि इतर राज्यांमधील आरक्षणाची टक्केवारी आदी मुद्द्यांकडे घटनापीठाचे लक्ष वेधले. मराठा समाजाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे आरक्षणावरील स्थगिती उठवायला हवी, असं रोहतगी म्हणाले. 10 टक्के आरक्षणातून खुल्यावर्गालाही आरक्षण देण्यात आले आहे. पण मराठा समजााला आरक्षण मिळालेले नाही, याकडेही त्यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. तर, कोर्ट सुरू होऊन फक्त एक आठवडा झाला आहे. जानेवारीत आपण रोज सुनावणी करू शकतो, असं जस्टिस भूषण यांनी सांगितलं.

आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. ठाकरे सरकारची बाजू मांडणारे मुकुल रहतोगी यांनी विद्यार्थ्यांंचं किती नुकसान होईल, नोकर भरतीचं काय होईल हे प्रश्न उपस्थित केले त्यावर सुप्रीम कोर्टाने हे उत्तर दिलं आहे.

 

News English Summary: The Supreme Court bench has refused to lift the stay on the Maratha reservation. The case has come before the bench today. You have time to think about it. Therefore, the decision will be taken only after an argument, said the bench, which refused to lift the stay. The bench also clarified that the next hearing will be held on January 25.

News English Title: Supreme court of India refuses to lift stay immediately on Maratha reservation News updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x