26 April 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

1 June Rules | 1 जूनपूर्वी तुमची आवडती कार, बाईक किंवा स्कूटर खरेदी करा | नंतर खर्च किती वाढणार पहा

1 June Rules

1 June Rules | जर तुम्ही नवीन बाईक, स्कूटर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 31 मे पर्यंत फायनल करा. आम्ही हे सांगत आहोत कारण 1 जूनपासून कार खरेदी करणे महाग होणार आहे. मात्र, यावेळी ते महाग असण्याचे कारण कंपनी नाही. उलट विमा कंपन्यांमुळे कार खरेदी करणं महागणार आहे. प्रकरण असे आहे की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करणे महाग होणार आहे. विम्याच्या नव्या किमती १ जूनपासून लागू होत आहेत.

नवीन दुचाकी वाहनांवर 17% पर्यंत प्रीमियम अधिक:
1 जून रोजी किंवा त्यानंतर नवीन टू-व्हीलर खरेदी केल्यास त्याच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम 17% अधिक महाग होईल. थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झाल्याने वाहनाच्या अंतिम किंमतीत वाढ होणार आहे.

जुन्या दुचाकी वाहनांचा विमा महागणार :
१. समजा तुम्ही टू-व्हीलर प्लॅन करत असाल, ज्याचं इंजिन 150 सीसीपेक्षा जास्त आहे, पण 350 सीसीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याच्या इन्शुरन्सवर 15% पर्यंत जास्त खर्च करावा लागेल. म्हणजेच अशा बाइकसाठी १३६६ रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे.

२. ३५० सीसी किंवा त्याहून अधिक पॉवर इंजिन असलेल्या बाइकची किंमत २,८०४ रुपये इतकी असणार आहे. या किंमती थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी आहेत.

जुन्या चारचाकी वाहनांचा विमा महागणार :
१. आता समजा समजा तुम्ही 1000 सीसी ते 1500 सीसीची कार किंवा एसयूव्ही प्लॅन करत असाल तर यासाठी तुम्हाला 6 टक्के अधिक प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच आता खासगी चारचाकी वाहनासाठी ३ हजार ४१६ रुपये थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम भरावा लागणार असून, पूर्वी तो ३ हजार २२१ रुपये होता.

२. अशाच प्रकारे तुम्ही 1500 सीसीपेक्षा जास्त पॉवरचे इंजिन असलेली खासगी चारचाकी वाहन खरेदी करत आहात, त्याच्या प्रीमियमवर तुम्हाला थोडी रात्र मिळेल. या गाड्यांवर आता तुम्हाला 7,890 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे, जो आधी 7,897 रुपये होता.

हायब्रीड, इलेक्ट्रिक वाहनांना मोठा दिलासा :
हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रीमियमवर 7.5 टक्के सूट मिळणार आहे. आता ३० किलोवॅटपर्यंत क्षमता असलेल्या ई-कारचा तीन वर्षांचा प्रीमियम ५,५४३ रुपये असेल. त्याचबरोबर ३० किलोवॅट ते ६५ किलोवॉट दरम्यानच्या ई-कारचा तीन वर्षांचा प्रीमियम ९,०४४ रुपये असेल. ६५ किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या ई-कारसाठी आता तीन वर्षांच्या प्रीमियमसाठी २० हजार ९०७ रुपये मोजावे लागणार आहेत.

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय :
थर्ड पार्टी विमाधारक वाहन मालकाला अशी सुविधा मिळते की, त्या वाहनामुळे झालेल्या अपघातात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला इजा झाली तर विमा कंपनी क्लेम थर्ड पार्टीला देते. वाहन अपघातामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आला आहे. या विम्याशिवाय रस्त्यावर वाहन नेण्याची परवानगी नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 1 June Rules will impact your money check details 28 May 2022.

हॅशटॅग्स

#Insurance Claim(19)#Vehicle Loan(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x