27 July 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड

360 ONE WAM Share Price

360 ONE WAM Share Price | ‘360 वन वाम’ ही कंपनी पूर्वी ‘IIFL वेल्थ मॅनेजमेंट’ कंपनी म्हणून ओळखली जात होती. या कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट सोबत गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे तर कंपनीने प्रती शेअर 17 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. इतकी मोठी घोषणा केल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी नाही आली तर नवलच. आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 1.80 टक्के घसरणीसह 1913.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,029.65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 360 ONE WAM Share Price | 360 ONE WAM Stock Price | BSE 542772)

कंपनीने केली मोठी घोषणा :
‘360 वन वाम’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेणी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 17 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 30 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे. कंपनी हा अंतरिम लाभांश शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल. सोबतच कंपनीने 1 : 2 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्यासही मान्यता दिली आहे. 18 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी प्रस्तावित स्टॉक स्प्लिट ची अमलबजावणी पूर्ण करणार आहे. स्टॉक स्प्लिटबाबत माहिती देताना कंपनीने म्हंटले आहे की, शेअर बाजारात आणि मुख्यतः आपल्या कंपनीच्या शेअर गुंतवणूकित किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे, आणि बाजारात स्टॉकची तरलता वाढवणे हा स्टॉक स्प्लिटचा मुख्य उद्देश आहे. लहान आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर अधिक परवडणारे व्हावे अनेक कंपन्या स्टॉक स्प्लिट करतात. सोबत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

‘360 वन वाम’ म्हणजेच पूर्वीच्या IIFL वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे प्रॉफिटेबल निकाल जाहीर केले होते. डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात 12.2 टक्के वाढ झाली असून कंपनीने 171.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 530.95 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 570.62 कोटी रुपयेच्या तुलनेत 7 टक्के घटले आहे. या कंपनीचे शेअर्स आज 1.70 टक्के कमजोरीसह 1915 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि कंपनीने यांकळत 415 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या वार्षिक आवर्ती महसुलामधे वार्षिक 12 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | 360 ONE WAM Share Price 542772 stock market live on 25 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x