Abhishek Integrations Share Price | मागील 1 वर्षात अभिषेक इंटिग्रेशन्स शेअर्सने 115% परतावा दिला, आता गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार

Abhishek Integrations Share Price | अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला आहे.

गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करणार

आता ही कंपनी आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करणार आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 52.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स तपशील

अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सेबी ला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. मात्र यासाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. 11 जुलै 2023 रोजी होणाऱ्या एजीएममध्ये कंपनी बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख जाहीर करणार आहे.

कंपनीची कामगिरी

ज्या गुंतवणूकदारांनी एका महिन्यापूर्वी अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीचे स्टॉक खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 32.66 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभरापूर्वी अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता दुप्पट झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Abhishek Integrations Share Price today on 20 June 2023.