1 May 2025 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

AccelerateBS India IPO | एक्सलेरेटबीएस इंडिया IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, शेअरची किंमत 90 रुपये, IPO तपशील जाणून घ्या

AccelerateBS India IPO

AccelerateBS India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्या साठी एक खुशखबर आहे. डिजिटल तंत्रज्ञान सेवा प्रदान करणाऱ्या एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचा IPO 6 जुलै 2023 पासून खुला केला जाणार आहे. 11 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूकदार IPO मध्ये पैसे लावू शकतात. (AccelerateBS Share Price)

एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचा SME IPO 90 रुपये प्रति शेअर किमतीवर लाँच करण्यात आला आहे. एक्सलेरेटबीएस इंडिया ही कंपनी जगभरात B2B आणि B2C अशा दोन्ही क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहक म्हणून तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्याचे काम करते. चला तर मग जाऊन घेऊ एक्सलेरेटबीएस इंडिया IPO ची डिटेल माहिती.

1. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचा IPO 6 जुलै ते 11 जुलै 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तर स्टॉक वाटप 14 जुलै रोजी करण्यात येतील. आणि 17 जुलै 2023 पासून शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांत जमा होतील.

2. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीच्या IPO ची किंमत बँड 90 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली आहे.

3. कंपनी एका लॉटमध्ये 1,600 शेअर्स जारी करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 144,000 रुपये जमा करावे लागतील.

4. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनी आपल्या IPO मध्ये 6.32 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

5. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनी आपल्या IPO मध्ये 188,800 फ्रेश शेअर्स ज्याचे एकूण मूल्य 1.70 कोटी रुपये असेल, आणि 3.99 कोटी मूल्याचे एकूण 443,200 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे.

6. कंपनीच्या प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल.

7. 19 जुलै 2023 रोजी एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

8. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीच्या IPO इश्यूमध्ये 50 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 50 टक्के वाटा इतर गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

9. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीच्या IPO साठी Shreni Shares Pvt Ltd ला लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर BigShares Services Pvt Ltd ला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

10. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनी आपल्या फ्रेश शेअर्स इश्यूमधून मिळालेली रक्कम दीर्घकालीन कार्यरत भांडवल आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी खर्च करणार आहे.

11. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचे प्रवर्तक केयूर दीपककुमार शाह आणि कुणाल अरविंद शाह हे आहेत. IPO नंतर या प्रवर्तकाचे भाग भांडवल 100 टक्केवरून 70.59 टक्के पर्यंत कमी होईल.

12. एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये सपाट किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच एक्सलरेटबीएस इंडिया कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये कोणत्याही प्रीमियम किंवा डिस्काउंट किमतीवर ट्रेड करत नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| AccelerateBS India IPO opend today on 6 July 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

AccelerateBS India IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या