17 June 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafon Idea Share Price | व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन स्टॉकबाबत मोठी अपडेट आली, स्टॉक BUY करावा? RVNL Share Price | PSU शेअर झटपट परतावा देतोय, 1 महिन्यात 42% कमाई, पुढेही मालामाल करणार Bonus Share News | सुवर्ण संधी सोडू नका, फ्री बोनस शेअर्स मिळवा, शॉर्ट टर्म मध्ये मोठा फायदा होईल Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रेटिंग अपग्रेड, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, यापूर्वी 1450% परतावा दिला IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सह हे टॉप 6 इन्फ्रा शेअर्स मालामाल करणार, आली फायद्याची अपडेट Yes Bank Share Price | स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, BUY करावा? Ashok Leyland Share Price | ऑटो शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर
x

Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.91 टक्क्यांच्या वाढीसह 3,456.25 रुपये किमतीवर पोहचले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 3,442.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 12 टक्के वाढले आहेत.

मागील वर्षी हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या अहवालामुळे अदानी समुहाचे सर्व शेअर्स कोसळले होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,92,473.89 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.19 टक्के घसरणीसह 3,381 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपनीचे बाजार भांडवल घसरुन 150 अब्ज डॉलर्सवर आले होते. या अहवालात अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग संबंधित फसवणुकीचे अनेक आरोप करण्यात आले होते. सप्टेंबर 2022 पर्यंत अदानी समुहाचे बाजार भांडवल घसरुन 150 अब्ज डॉलर्सवर आले होते. या अहवालानंतर गौतम अदानी जगातील टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले होते.

गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्ती 27 फेब्रुवारी 2023 रोजी 37.7 अब्ज डॉलर्सवर आली होती. नंतर अदानी समुहाच्या कंपन्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने हिंडेनबर्ग अहवालाचा OCCPR अहवाल आणि तृतीय पक्ष संस्थेवर अवलंबून राहण्यास नकार दिला होता. सध्या परिस्थितीनुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर्स आहे. गौतम अदानी सध्या जगातील 13 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

2013 मध्ये अदानी समूहाने सरकारी मालकीच्या कंपन्यांना कमी दर्जाचा कोळसा पुरवठा केला होता, असे आरोप अदानी ग्रुपवर करण्यात आले होते. मात्र कंपनीने सर्व आरोप फेटाळले आहेत. मागील एका वर्षात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 39.51 टक्के मजबूत झाले आहेत. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 15.90 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 25 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x