
Adani Gas Share Price | आज अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरप्रकार संबंधित आरोप केले होते, त्यात कोणतीही सत्यता नसल्याची माहिती अमेरिकन सरकारने दिली आहे. अमेरिकन सरकारने अदानी समूहाला हिंडनबर्ग फर्मच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आज अदानी समुहाचे शेअर्स जोरदार तेजीत धावत आहेत.
अदानी समुहाच्या कंपनीच्या शेअरमधील वाढीमुळे गौतम अदानी पुन्हा एकदा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश बनले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीने सर्वाधिक वाढ नोंदवली होती. तर आज जवळपास अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 878.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 132200 रुपये झाले असते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 701.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अदानी एनर्जी सोल्यूशन कंपनीचे शेअर्स मागील एका आठवड्यात 18.21 टक्के वाढले होते. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका आठवड्यात 720 रुपयेवरून वाढून 954.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 854.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने देखील एका आठवड्यात गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 380.05 रुपये किमतीवरून वाढून 470.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 440.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी ग्रीन स्टॉक मागील एका आठवड्यात 10.57 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 8.62 टक्के मजबूत झाले आहेत. अदानी विल्मार कंपनीच्या शेअरने देखील आपल्या गुंतवणुकदारांना एका आठवड्यात 7.88 टक्के परतावा दिला आहे. तर मागील एका आठवड्यात अंबुजा सिमेंट स्टॉक 6.35 टक्के आणि ACC स्टॉक 4.43 टक्के वाढला होता. अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स देखील एका आठवड्यात 4.38 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.