
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, रेटिंग एजन्सी ICRA ने कंपनीची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड करून [ICRA] AA केली आहे. ही बातमी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी अदानी टोटल गॅस स्टॉक 2.06 टक्क्यांच्या घसरणीसह 951.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 957.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश )
मंगळवारी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 63,000 शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा मागील दोन आठवड्यांच्या 1.56 लाख या सरासरी ट्रेडिंग आकड्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,04,685.42 कोटी रुपये आहे. अदानी टोटल गॅस स्टॉक आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीपेक्षा जास्त किमतीवर आणि परंतु 5 दिवस आणि 100 दिवसांच्या SMA पेक्षा कमी पातळीवर ट्रेड करत आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरचा 14 दिवसीय सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 56.14 अंकावर आला आहे. या कंपनीचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 160.24 आहे. आणि प्राइस-टू-बुक मूल्य 29.38 आहे. स्टॉकची प्रति शेअर कमाई 18.33 अंकावर असून इक्विटीचा परतावा दर 5.94 आहे. नुकताच अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 16,600 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे.
यासह अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे किंवा इतर कोणत्याही अनुज्ञेय पद्धतींद्वारे 12,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. अदानी एनर्जी कंपनीवर 2023-2024 च्या आर्थिक वर्षाच्या शेवटी एकूण 5,165 कोटी रुपये कर्ज होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.