30 April 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News

Highlights:

  • Adani Green Share PriceNSE: AdaniGreen – अदानी पॉवर लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
  • कंपनीने निवेदनात दिली माहिती
  • कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर स्टॉकमध्ये वाढ
Adani Green Share Price

Adani Green Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाने 6,600 मेगावॅट क्षमतेच्या नूतनीकरणक्षम आणि औष्णिक उर्जेच्या दीर्घकालीन प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रॅक्ट (NSE: AdaniGreen) मिळवला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवरा येथे विकसित करणे प्रस्तावित असलेल्या जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पार्कमधून 5 गिगावॅट सौर ऊर्जा पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने अदानी पॉवर कंपनीसोबत करार केला आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी अदानी ग्रीन स्टॉक 7.59 टक्के वाढीसह 1,924 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (अदानी पॉवर लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
अदानी पॉवर लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज निर्मिती कंपनी असून त्यांनी MSEDCL सोबत महाराष्ट्राला नवीन 1600 मेगावॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्पातून 1496 मेगावॅट औष्णिक वीज पुरवठा करण्याचा करार केला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, त्यांनी “1600 मेगावॅट औष्णिक उर्जा आणि 5000 मेगावॅट सौर उर्जेच्या संयुक्त खरेदीसाठी महावितरणने सुरू केलेल्या स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे 6600 मेगावॅट क्षमतेचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे”.

कंपनीने निवेदनात दिली माहिती
अदानी ग्रीन कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, भारताच्या हरित ऊर्जा वापरला गती देणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. भारताच्या ऊर्जा स्वातंत्र्य आणि शाश्वत भविष्याच्या उभारणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. अदानी ग्रीन कंपनी देशभरात मोक्याच्या ठिकाणी सुरक्षित संसाधन-समृद्ध साइट्स, नूतनीकरणयोग्य आणि स्टोरेज सोल्यूशन्सचे पोर्टफोलिओ मिश्रण, मजबूत पुरवठा साखळी आणि स्पष्ट निर्गमन योजनांसह 50 GW क्षमतेचे ऊर्जा निर्मिती लक्ष्य साध्य करण्यास सक्षम आहे.

कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर स्टॉकमध्ये वाढ
अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक मागील आठवड्यात शुक्रवारी किंचित घसरणीसह क्लोज झाला होता. शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 1,787 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हिंडनबर्ग फर्मच्या आरोपानंतर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. या आरोपात काहींनी दावा केला होता की गौतम अदानी यांचे 10 अब्ज डॉलर्स स्विस बँकेमध्ये गोठवण्यात आले आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला ही मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर स्टॉकमध्ये वाढ होण्याची मजबूत शक्यता निर्माण झाली आहे.

Latest Marathi News | Adani Green Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या