 
						Adani Green Share Price | अदानी समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पण्या आणि अमेरिकन एजन्सीच्या सकारात्मक अहवालानंतर अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते.
मागील काही दिवसात अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर आज देखील यातील काही शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.56 टक्के घसरणीसह 1,550.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के घसरणीसह 2,846.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 1,171.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शरास 714 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दररोज 20 टक्के या प्रमाणे वाढत या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1158 रुपये किमतीवर पोहचले होते.
NDTV कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.80 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 टक्के घसरणीसह 273.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		